या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

R आईबापाचा मित्र. करितात. ती उठतात कशीं, बसतात कशीं, करतात काय, त्यांस चांगलें काय वाटतें, वाईट काय वाटतें, याकडे त्यांचे एकसारखें लक्ष असतें. आईबापांनीं न शिकवितां तीं त्यांचे गुणदोष घेत असतात, त्यांचा वर्तनक्रम पाहून ती आपला वर्तनक्रम ठरवीत असतात, यामुळे ‘खाण तशी माती’ या ह्मणीची सत्यता जगास आपोआप येत असते. ३ इतकें मनांत आणल्यावर आईबाप बनणारांनी कसें वागावें, आपल्यांत कांहीं कमतरपणा असल्यास तो नाहींसा करण्याकरितां आधीं प्रयत्न कां करावे, संततीवर ताबा चालवण्यापूर्वी आपल्या मनावर ताबा चालवण्यास कां शिकावें, या गोष्टी सहज लक्षांत येतील. ४ मुलास कित्ता वाईट दिल्यास त्याचें अक्षर चांगलें होईल, ही आशाच करावयास नको. एखादं नियमित वळण त्यास लागावें, अशी आपली इच्छा असल्यास, त्यास तसल्या वळणाचाच कित्ता दिला पाहिजे, हें कोणीही कबूल करील. इतर गोष्टींसही हाच नियम लागू आहे. मग बाह्य सृष्टीपासून व समाजापासून मनुष्यास होणारे सर्व लाभ यास प्राप्त व्हावे; त्यानें आपल्या कुटुंबाचे योग्य प्रकारें पालन करून, समाजाच्या व देशाच्या कल्याणास तयार व्हावें; जगांत नांव मिळवून आपल्या जन्माचे सार्थक करावें; अशी आपली इच्छा असल्यास त्या मुलापुढे जो कित्ता (जें उदाहरण) आपल्यास ठेवावयाचा, तो किती वळणशुद्ध असला पाहिजे, हें काय सांगावें ! तो जितका उत्तम असेल तितका चांगलाच ! ५ असा कित्ता मिळवावयाचा तरी कोठे ! ती शोधण्यास लांब जाऊन चालावयाचें नाहीं, तो घरांतल्या घरांतच तयार केला पाहिजे. कारण मुलांस सर्व वेळ आईबापांची संगति असते. याकरितां मुलें आईबापांचा कित्त्यासारखा उपयोग करीत असतात. आईबाप हे मुलांस कित्त्यासारखे उपयोगी पडणारे आहेत, त्यांचे वळण मुलांच्या नजरेस एकसारखें पडावयाचे आहे व तेंच मुलांच्या वर्तनांत प्रतिबिंबित व्हावयाचे आहे; याकरितां आपल्या