या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ आईबापांचा मित्र. असें पुरुषांस वाटतें; पण पुरुषांस कांहीं व्रत आहे, अशी त्यांची कल्पना नसते. परस्री वज्यै करावी, असें वेगळे सांगण्याचे कारण या श्लोकानें उरत नाहीं. खस्री झाली तरी ही ऋतुकालाशिवाय गमन मनांत आणतां उपयोगी नाहीं, व पर्वदिवस आणखी वज्र्य आहेतच. या सर्वोचा मुद्दा पुरुषानें केवळ त्रैण बर्नू नये, आपल्या वीर्यास नीट जपावें, इंद्रियनिग्रही व्हावें, व त्याच्या योगानें सशक्त राहून सर्व पुरुषार्थ साधणारें व्हावें, हाच आहे. आईबापांनीं हा श्वठोक सर्वकाळ आपल्या अंत:करणांत बाळगण्यासारखा आहे. ४ मनूनें म्हटलें आहेः— नै जानु कामः कामानामुपभोगेन शाम्यति । हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते । मनु-अ. २ लोक ९४ काम उपभोगानें कमी होत नाहीं, वाढतो. याकरितां कामाच्या खाधीन होणें चांगलें नाहीं. फुलांचा उपभोग घेऊं लागल्यास फळांचा लाभ होणार नाहीं, त्याप्रमाणें कामासक्ति वाढल्यास चांगली संतति लाभणार नाहीं. संतति चांगली व बेताची असज्यास ती अधिक सुखास कारण होते. संतति रोगी व पुष्कळ असल्यास तिचे रक्षण करण्याचे कठीण पडतें, व तिच्यापासून आपणांस सुखाचा लाभ व्हावा तेवढा होत नाहीं, याकरितां इंद्रियनिग्रह अवश्य करावा. पूर्वीच्या ग्रंथांत चांगल्या संततीची इच्छा करणाच्या आईबापांनी तपश्चर्या केल्याच्या अनेक कथा आढळतात, त्यांचे तात्पर्य हेंच आहे. इंद्रियनिग्रहाशिवाय तपश्चर्या होत नाहीं, व इंद्रियनिग्रह चांगली संतति होण्याचे प्रधान कारण आहे, याकरितां चांगली संतति इच्छिणारांनी इंद्रियनिग्रह अवश्य करावा. ५ ईद्रियनिग्रही भीष्म केवढा पराक्रमी होता, किती दीर्घायुषी

  • कामाच्या (विपयांच्या) उपभोगानें काम (इच्छा-विषयसुखाची दच्छा) कधीही निवृत्त होत नाहीं, तर घृतार्ने जसा अशि प्रदीप्त होतो, तद्वत्, (विषयसेवनानें) काम पुनः वृद्धिंगत होती.