या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला. १५ ७ प्रत्येकानें पूंर्ण मनुष्य बनण्याचा प्रयत्न करावा, कारण त्याशिवाय खरें थोरपण प्राप्त व्हावयाचें नाहीं, व ख=या सुखाचा लाभ व्हावयाचा नाहीं. नुसती शारीरिक शक्ति वाढल्यास ती लोकांस ताप देणारी होईल. नुसती मानसिक शक्ति वाढल्यास शारीरिक शक्तीशिवाय तिचा योग्य उपयोग करतां येणार नाहीं. नैतिक शक्ति आंगीं असल्याशिवाय या दोन्ही शक्तींचा उपयोग परोपकाराकडे करतां येणार नाहीं. याकरितां ही पूर्णत्वाची कल्पना आईबापांनी आपल्या ध्यानांत ठेवावी, व ती साधण्याचा प्रयत्न करावा. ८ आरंभीं सवांचीच प्रकृति चांगली असण्याचा संभव नसतो. तरी यत्नानें ती दुरुस्त ठेवितां येईल. सर्व आयुष्यांत औषधाचा उपयोग करावा लागला नाहीं, अशीं माणसें पूर्वी बरीच आढळत. हल्लीं तेवढीं आढळत नाहीत. तरी आपल्या प्रकृतींत उणीव काय आहे, ती शोधून काढून नाहींशी करण्याचा प्रयत्न आपल्यास करतां येईल; आपल्या परिश्रमानें व योग्य वागणुकीनें ती सुधारतां येईल, व आपल्यास पूर्वीपेक्षां सशक्त व तेजखी बनतां येईल. ‘प्रयत्ज्ञांतीं परमेश्वरं या ह्मणीवर योग्य लक्ष् टेवृन प्रयत्न केल्यास, मनोवासनांच्या जाळ्यांत न सांपडतां सन्मार्गानें वागल्यास व आपल्या जन्माचा सदुपयोग करावयाचा अशी दृढ भावना ठेवल्यास, सर्वेश्वर आपल्या कृपाप्रसादानें सर्वोस सिद्धि देईल, कोणाचीही उपेक्षा करणार नाहीं. ९ जी गोष्ट शारीरिक शक्तींस लागू आहे, तीच मानसिक शक्तींस व नैतिक वासनांसही लागू आहे. मानसिक शक्ति ही अभ्यासानें वाढवितां येईल. चांगलें काम करावयाचे असा एकदा दृढ १ मिल्ल, स्पेन्सर, इल्यादि आधुनिक तत्ववेत्यांची पूर्णत्वास पावलेल्या मनुष्याबद्दल कल्पना अशी आहे. “शारीरशक्ति, मानसिक शक्ति, नैतिक वासना, इत्यादि सर्व ज्याच्या पूर्ण झाल्या आहेत, ( पूर्णदशेस आल्या आहेत) तो पूर्ण मनुष्य.” स्वातंत्र्य-स्पष्टीकरणार्थ टिपा टg ५० रकाना १ •