या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला. १७ किंवा परोपकाराचीं कामें करण्यांत, किंवा लिहिण्यावाचण्यांत, दवडण्याची संवय लावल्यास फार चांगलें होईल. रिकामें बसून स्थूळ बनण्यापेक्षां-तुळशीला प्रदक्षिणा घालण्याचे,-धर्मभोळेपणाचे-काम केलें तरी चिंता नाहीं, त्यापासून शरीरप्रकृति सुधारण्याचा फायदा तरी नि:संशय पदरांत पडेल. १२ संततीच्या रक्षणाचे सर्व ओझें स्त्रियांवर पडावयाचे असतें. याकरितां त्यांची शरीरसंपत्ति अधिक चांगली असावी लागते. बाळंतपण-ह्मणजे एक-पणच आहे, यांत कांहीं संशय नाहीं. प्रकृति सशक्त असल्यास बाळंतपण सुखानें पार पडतें. अशक्त स्त्रियांस तें फार जड जातें, व पुष्कळ वेळां त्यांच्या जिवावरही प्रसंग येतो. याकरितां स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावें. गरोदरपणांत त्यांची प्रकृति निरोगी असल्यास होणारें बाळक निरोगी होतें, तें लहान असतां त्यास रोग झाला नाही, तर पुढे त्याची प्रकृति सहसा बिघडत नाहीं, त्यास निरोगी दूध मिळाल्यास तें गोंडस व टवटवीत होतें. मुलांची वाढ सर्वखीं स्त्रियांच्या निरोगीपणावर अवलंबून आहे. याकरितां स्रियांनी आपल्या प्रकृतीची हेळसांड सहसा करूं नये. ६ विवाहित स्थितीविषयीं आधीं विचार करावा. १ मनुष्यास एकटें राहाणे आवडत नाही. तो संगतिप्रिय प्राणी आहे. यामुळे पुरुषांची किंवा स्रियांची विवाहाकडे ओढ असते, हें ठीकच आहे. परंतु विवाह करण्यापूर्वी त्यांनीं पुष्कळ विचार करावा. तो विचार बरेच वेळां होत नाहीं, यामुळे पुढे अडचणी उत्पन्न होतात. विवाह स्रीपुरुषांनी आपल्या सुखाकरितां करावयाचा आहे, पण पुष्कळ वेळां तो त्यांस दु:ख देणारा होतो. याकरितां विवाह केल्यावर ज्या अडचणी उत्पन्न होण्याचा संभव आहे, त्यांचा पूर्वी विचार करावा. संतति हें विवाहाचे फळ आहे. तें प्राप्त झाल्यावर त्याचें यथास्थित रक्षण करण्याचे जोखीम विवाहितांस पतकरिलें पाहिजे. केवळ खसुखावर लुब्ध होऊन संत