या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

※< आईबापांचा मित्र. तीच्या सुखाकडे दुर्लक्ष ल्यांस करितां येणार नाहीं. मानवजातीस तर तें वट्टा लावणारें आहे. संतति चांगली असावी, असा त्यांचा हेतु असावा. दुबळी संतति झाल्यास त्या संततीला तर दुःख भोगावें लागतेंच, पण आईबापांसही दु:ख भोगावें लागतें. पुष्कळ संतति झाली तरीही हाच प्रकार होतो. संततीबरोबर आईवापांची प्रति वाढणें सर्वदा शक्य नसतें. असलेल्या प्राप्तींत त्यांचा निर्वौह प्रथम सौख्यानें होत असतो, पण एकदा संतति वाढत चालली ह्मणजे तो होणे कठीण पडतें. तेव्हां आईबापांनी पहिल्यापेक्षां अधिक श्रम करून द्रव्य संपादन केलें पाहिजे, किंवा असलेल्या खर्चीत काटकसर करून निर्वाह केला पाहिजे. उभयतांनीं नियमितपणाचे वर्तन ठेवल्यास ह्यांस आपला संसार सुखाचा करितां येतो, तसें न झाल्यास संसाराचा बिघाड होतो. या गोष्टींच f विचार आईवाप होणारांनी विवाहापूर्वी करावा. विवाहानतर खर्च वाढणार हें ठरलेलेंच आहे. संतति होणार व तिच्या जोपासनेचा बोजा आंगावर पडणार यांतही संशय नाहीं. तेव्हां पुढील वागणुकीचा विचार आधीं ठरला असल्यास पुढे होणारी कुतरओढ, जळफळाट, संसाराचा उत्पन्न होणारा वीट, इत्यादि गोष्टी टाळतां येतील. २ विवाह हें व्यक्तिमात्राच्या सुखाचे साधन आहे, त्याप्रमाणें तें समाजाच्या सुखाचेही साधन आहे. कारण समाज व्यक्तींच्या समुदायानें होतो. व्यक्ति जितक्या जोमदार असतील, तितकी समाजाची बळकटी अधिक असेल. अशक्त व्यक्तींचा समाजही अशक्तच असणार. याकरितां विवाहित जोडप्यानें सुखानें नांदावें, इतकाच विवाहाचा हेतु मनांत आणून चालवयाचे नाहीं. यापेक्षां विवाहाचा हेतु अधिक महत्वाचा मानला पाहिजे. पुढील उतारा पाहा: ‘विवाहित जोडप्यास सुख व्हावें, हा लग्नाचा उद्देश नेहमी असतोच. पण लझापासून जी संतति होईल, ती चांगली फ़ूि हातातोंडास यावी, हा उद्देश यापेक्षांही श्रेष्ठ समजला पाहिजे.