या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला, १९ प्रत्येक कुटुंबांत चांगली संतति ( सशक्त व निरोगी ) उत्पन्न झाली, तरच एकंदर मानवजातीची सुधारणा होत जाऊन माण साचा जास्त जास्त अभ्युदय होत जाणार.” आत्मनीतीचीं तत्र्वे-पृष्ठ. १८० ३ ही गोष्ट आईबापांनीं लक्षांत बाळगावी. आपली संतति कायैकती व्हावी, म्हणून त्यांनीं प्रयत्न करावे. समाजास भारभूत संतति होऊं नये ह्मणून काळजी घ्यावी, कारण हें त्यांचे कर्तव्यच आहे. विवाहापासून होणाच्या सुखाचा लाभ मात्र त्यांनी घ्यावा, व निर्जीव, व्यंग, अशा संततीचा भार समाजावर टाकावा, हें ल्यांस भूषणास्पद नाहीं. पुढील उतारा पाहा:- - “प्रजोत्पादनापासून सुख होईल तेवढे मात्र भोगावयाचे; त्या मुलांचे पालन, पोषण, किंवा शिक्षण, ह्यांची जबाबदारी लोकांवर टाकावयाची, असें मात्र कामाचें नाहीं. सुखोपभोग व अांगावर पडणारी जबाबदारी, यांची नेहमी सांगड असली पाहिजे. जी कोणी सुखोपभोग घेईल, त्यानें तजन्य यातना भोगण्यास तयार असलें पाहिजे.’ आत्मनीतीचीं तत्र्वे-पृष्ठ. १८१ यावरून इतकें लक्षांत येईल कीीं, विवाह करावयाचा ह्मणजे होणाच्या संततीच्या जोपासनेचें काम अांगावर घ्यावयाचे असें समजलें पाहिजे. ४ मुलें झाल्यावर आईबापांवर मोठी जबाबदारी पडते, यांत संशय नाहीं. पण त्यांनीं विवाह करण्याचे पतकरिलें ह्मणजे ही जबाबदारी त्यांची त्यांनीं पतकरली पाहिजे. ही पतकरणे ह्मणजे मोठे कठीण आहे, असेंही नाहीं. कारण त्यांस ‘आईबाप’ हा किताब संततीपासूनच मिळतो. ज्यांस संतति नाहीं, लांस आईबाप कोण ह्मणेल ? त्यांचे आयुष्य पुष्पहीन व फलहीन वृक्षासारखें समजावयाचें. संततीचे पालनपोषण करण्यांत ह्यांस एकप्रकारचे उखही मिळतें. त्यांच्यावर संततीपासून अनेक प्रकारचे सुख