या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला- さ、球 परिणाम घडतातसे वाटतें, तेव्हां त्यांस व्यसनांत गणण्यास काय हरकत आहे ? एकसारखें काम ज्यांस करावें लागतें, यांस विसांव्याकरितां अशा कांहीं गोष्टींची जरूरी असते, असें पुष्कळांस वाटतें. पण या गोष्टी एकदा अशा निमित्तानें पुढे आल्या, ह्मणजे मग त्यांचेंच वर्चख व्यक्तींवर होतें ! तींच पुढे पैशाचा रिकामा खर्च होण्याचीं साधनें बनून जातात ! एखाद्या वेळेस चहाकाफीवा एखादा पेला घेतला, प्रसंगविशेषीं तंबाखूची एखादी चिमटी तोंडांत टाकली, किंवा विडी ओढली, ह्मणजे बिघडलें असें नव्हे. पण चहाचे पेल्यांवर पेले लागूं लागले, किंवा दिवसांतून दोनतीन वेळ चहा मिळाल्याशिवाय चालेनासें झालें; जेवण न मिळालें तरी चालेल, पण चहा मिळाला पाहिजे असें होऊं लागलें; विड्यांचे जुडग्यांचे जुडगे खपूनही समाधान होईनासें झालें, चिरूटांची प्रार्थना करण्याची गरज भासू लागली; ह्मणजे त्यास व्यसन ह्मणू नये तर काय ह्मणावें ? ३ कोणत्याही मनुष्यास असें व्यसन असणें चांगलें नाहीं. घरांतील पुढाच्यास एकदा व्यसनानें गांठलें म्हणजे सर्व कुटुंब हळू हळू व्यसनाधीन होऊन जातें; निदान तसें होण्याचा संभव तरी उत्पन्न होतो, व घरांतील पुष्कळ पैसा व्यर्थ जातो. याकरितां आईबापांनी-होतां होई तों-या क्षुल्लक व्यसनांचा सुद्धां शिरकाव आपल्या घरांत न होऊं देण्याकरितां जपणें चांगलें. जोंपर्यंत प्रपंचाचा पसारा फारसा नसतो, तोंपर्यंत असल्या व्यसनांपासून होणारा अपाय फारसा दिसणार नाहीं, पण चार मुलेंबाळे झालीं म्हणजे हाच खर्च आपल्यास भंडावून सोडील. ‘हांतरूण पाहून पाय पसरावे' या तत्वाचा धडा आरंभापासून गिरवेिला नसल्यास तो एकदम साधणार नाहीं; व एक रिकामी खचीची बाब आपण आपल्या घरांत घुसवून घेतल्याबद्दल आपणांस पश्वाताप करण्याची वेळ येईल. ४ अफूनें कित्येकांच्या हाडांचीं काडें झालेली आपण ऐकतों; गांजाच्या चिलमेनें कित्येकांनी आपल्या संसाराची राखरांगोळी