या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

없 लावितां येईनासें झालें आहे. एखादें काम तडीस लावण्याचे मनांत आणल्यास, अनेक बाजूंनीं अनेक अडचणी उत्पन्न होतात; त्यांचे निवारण करतां करतां आह्मांस पुरेवाट होते; शेवटीं आह्मी यलपराङ्मुख होऊन भदरून जातों, व आमचें कर्तव्य कोणतें हेंही आह्मांस नीट कळेनासें होतें ! ३ आमच्या पूर्वजांचा वर्तनक्रम आह्मीं सोडून दिला आहे, व नवीन मार्गाचे अवलंबन आह्मांस नीटसें साधलें नाहीं. आह्मी नुसते चकित होऊन, रोज नव्या नव्या दिसणा-या अनेक गोष्टींच्या अद्भुत दर्शनानें शिथिल व स्तब्ध होऊन राहिलों आहों, व आश्चर्यंयुक्त मुद्रेनें या विचित्र व्यवहाराकडे नुसते पाहात राहिलों आहों, पण अशानें काय होणार ! आमचे खरं कर्तव्य कोणतें, तें आह्मीं निवडून काढिलें पाहिजे, व सृष्टींतील अनेकविध घडामोडींत आह्मांस कसें घुसतां येईल, याचा विचार केला पाहिजे. ४ ‘पराधीन जिणें व पुस्तकी विद्या' ही ह्मण आह्मांस बरोबर लागू पडते. आमच्या शिक्षणाचा उपयोग, आह्मांस नोकरीशिवाय कांहीं करितां येत नाहीं किंवा होत नाहीं. परंतु असें होणें चांगलें नाहीं. ही स्थिति आपण आपल्या प्रयत्नानें बदलली पाहिजे. ती कशी बदलावी हा मोठा प्रश्न आहे. तो सोडवावयाचा, ह्मणजे पुढील पिढी कर्तबगार निघण्याकरितां प्रयल करावयाचे. तें काम सोपें नाही. त्याकरितां आमच्या हृल्लींच्या स्थितीत बरेंच परिवर्तन घडवून आणलें पाहिजे. तें काम आईवापांच्या दृढ प्रयत्नांशिवाय व्हावयाचे नाहीं. याकरितां आईबापांस कांहीं हिताच्या गोष्टी सांगाव्या, असें योजिलें आहे. त्यांचा उपयोग आईबापांनी करून घ्यावा, व त्यांत आपल्या अनुभवाची भर टाकावी. ५ आइवापांचे प्रेम आपल्या संततीवर किती असतें, हें सर्वौस ठाऊक आहे. पण त्या प्रेमाचा मोबदला पुष्कळ आईवापांस संततीकडून मिळत नाहीं, किंवा त्यांस तो मिळालासा तरी वाटत नाहीं; तर असें कां न्दवं* ज्या आईनें मुलास नऊ महिने आपल्या पोटांत वागविलें, तीकर अभीति करण्यास त्या मुलानें कां तयार व्हावें ? किंवा जो बाप