या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा- ३१ अांगावर पिणाच्या मुलांस बाधा केल्याशिवाय राहात नाहीत. मूल अांगावर पीत आहे, तोंपर्यंत आईनें आपली प्रकृति नीट राखण्याची काळजी घेतल्यास, मुलांच्या प्रकृतीविषयीं वेगळी काळजी घेण्याचे कारण उरणार नाहीं. ५ मुलगें रडू लागल्यास त्यास खावयास द्यावें. त्याचें पोट वगैरे दुखत असल्यास त्यास कांहीं बारीकसारीक अँषध घालावें. लहान मुलांस बरेच विकार जंतांपासून होत असतात, याकरितां इतर उपचार करण्यापूर्वी जंतांवरचे उपचार प्रथम करावे. अफू वगैरे घालण्याची संवय होतां होईतों लावू नये. तशी संवय लावल्यास त्यास पुढे अफूशिवाय चैन पडेनासें होतें, व त्यास अफूचें व्यसन आपणच लावून दिल्यासारखें होतें; तें पुढे सुटतां सुटत नाहीं, सोडूं लागल्यास मूल अधिक किरकिरें बनतें, यापेक्षां वाईट परिणाम घडण्याचाही केव्हां केव्हां संभव असतो. औषधोपचारही साधेलतों घरगुती करणें चांगलें. दिवसभर डाक्टरांचीं घरें धुंडाळणे चांगलें नाहीं. मुलगें रडतें ह्मणून त्यास खाऊ देऊन उगें करूं नये. वारंवार खाऊ मिळत गेल्यास त्यास तीच चट लागण्याचा संभव असतो, व मग तेंच कारण त्याची रड वाढवण्यास पुरेसें होतें. शिवाय त्यास जंतांचा किंवा दुसरा एखादा विकार जडण्याचाही संभव असतो. तेव्हां बारीकसारीक गोष्टींत सुद्धां मुलांस वागवतांना दक्षतेनें वागावें व प्रेम अधिक उणें होऊं देऊं नये. ६ मुलास प्यावयास घ्यावयाचें तें वारंवार व अनियमितपणें घेऊं नये. नियमित वेळां व नियमित वेळ मध्यें जाऊं देऊन ध्यावें. एकसारखें मुलास कुशींत घेऊन पाजीत सुटणें, किंवा आपण झोंपीं जाऊन त्यास पिऊं देणें, चांगलें नाहीं. मुलास पाजणें झाल्यास आपण उठून बसावें, त्यास पुरतें पाजावें, व मुलास थोपटून निजवून मग आपण निजावें. मुलाची जोपासना हें आईनें आपलें पहिलें काम समजावें. इतर सतरा कामें करावयाचीं व मुलास रडत टाकावयाचे, असें करूं नये. एखादें काम कमी झालें