या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ आईबापांचा मित्र. तरी चालेल, किंवा त्यास अंमळ वेळ लागला तरी चालेल. प्रथम मुलाची योग्य तरतूद ठेवण्याची काळजी घ्यावी. घरांत दुसरी मनुष्यें नसल्यास व मजूर ठेवण्याची ताकद नसल्यास, सर्व कामें घरांत करावी लागतील, हें उघड आहे. पण ती कामें आपली प्रकृति शांत ठेवून, मुलास न दुखवितां, हळूहळू करतां येतील तशीं करावीं. ज्या गोष्टींस इलाज नाही, त्या गोष्टींबद्दल उगीच धडपड करून रागानें आपलें शरीर जाळून घेऊं नये. आपली प्रकृति आनंदी ठेवल्यास मुलावर त्याचा सुपरिणाम घडल्याशिवाय राहणार नाहीं, मुलाचें पोट वेळच्यावेळीं भरत असलें, यास कांहीं इजा नसली, ह्मणजे तें रिकामी रड कधीं घेणार नाही. त्यास वेळच्यावेळीं खावयास मिळत असलें, ह्मणजे त्याच्या पोटांतील दुघाचे पचन नीट होईल, तें नेमलेल्या वेळीं पोटभर खाईल, त्यास झोंप चांगली येईल व तें निरोगी बनत जाईल; आईच्या अांगावर नियमित दूध सांचेल व उभयतांस नियमित वर्तनाचा धडा मिळेल. ° आईच्या अांगावर मूल प्यावयाचे असतें. ह्यणून तिनें आपल्या प्रकृतीस जपावें, ह्मणजे त्यांत तिचे व संततीचे हित होईल. अाईनें अन्न खाणें तें साधे पण खच्छ, मिळेल त्या बेतानें पौष्टिक, पण पथ्यकर व सहज पचणारें, खावें. कारण ‘पचेल तें खावे? या हंगीत पुष्कळ तथ्य आहे. चांगलें व पौष्टिक अन्न खाल्ले, पण त्याचे पचन झालें नाहीं, तर तें प्रकृतीस हितावह होणार नाहीं. आनंदानें राहावें; रिकामी काळजी करूं नये, व देवानें दिलेली अपल्यरूप अमूल्य देणगी आपणांस प्राप्त झाली आहे, याबद्दल ह्याचे आभार मानून तिच्या रक्षणाकरितां अत्यंत कष्ट सोसावे; ह्यणजे त्या योगानें उभयतांस सुख व आनंद हीं प्राप्त होतील. ८ मुलांच्या आयांनीं अांगावर मूल पीत आहे तोंपर्यंत, अनेक तते व उपवासासारखीं तामस कमें,करूं नयेत. ह्यांनी आपलें मुख्य कर्तव्य-मुलांचे संगोपन-हें-समजावें, ह्मणजे त्यांस अनेक व्रतांचे पुण्य लागेल.