या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

с. - 9く आइंबापांचा मित्र. या श्लोकांत वर्णिलेल्या सुखाचा अनुभव आपण जेव्हां घेतों, तेव्हां तें सुख आपल्यास संततीच्या लाभाखेरीज घेतां येतें काय ? किंवा त्या सुखाला परिमिति असते काय ? ‘सुख पाहतां जवापाडें, दु:ख पर्वताएवढे' या तुकारामाच्या उक्तीप्रमाणे आपण सुख पार विसरून जातों, व एवढ्या तेवढ्यावरून संततीवर रुसूं. लागतों, असें करणें चांगलें नाहीं. आपण संततीवर उपकार केले आहेत ही गोष्ट खोटी नाहीं, पण ते आपण आपल्या तोंडानें संततीस सांगत बसणें चांगलें नाहीं, कारण केव्हां केव्हां तेंच संततीस अधिक कटाळवाणे वाटतें. आपल्यास वेळोवेळीं संततीपासून जो सुखाचा लाभ मिळाला आहे, तो मनांत ठेवून, आपण आपल्या चित्तास वारंवार शान्त करीत असावें. संततीचे अपराध होतील तेवढे सहन करावे. त्यांस प्रेमळ शब्दानें उपदेश करून त्यांची योग्य मार्गाकडे प्रवृति होईल, असें करण्याचा यन्न करावा. ४२ सीतेच्या बाळपणांत जनकानें तिच्याकडे पाहून जें सुख अनुभविलें, ह्याचे वर्णन कै. परशुरामतात्यांनी खाली लिहिल्याप्रमाणे भाषांतररूपानें वनदेवतेच्या मुखानें वदविलें आहे:

  • थोडथोड्या कोवळ्या दंतपंक्ती

जयामाजी उगवल्या शुभ्रकांती । जयापासुनि बोबडे बोल गोड - निघुनि माझें पुरविलें तिहीं कोड' ॥ १ ॥ ४३ हा अनुभव प्रखेक आईबापाला येण्यासारखा आहे. तो पदोपदीं येणारा आहे. त्या आनंदाला पारावार नाहीं. मुलांच्या जोपासनेंत जे कष्ट होत असतात, ते आईबाप याच आनंदाच्या जोरावर सोसतात, व आपल्या संसाराचा गाडा आनंदानें ओढीत असतात. मग हा असला आनंद ज्या संततीपासून आपल्यास मिळाला आहे, तिच्यावर रुसणें आपणांस वाजवी नाहीं. तिच्यापासून मिळेल तेवढा सुखाचा मोबदला आईबापांनी खुशाल घ्यावा, पण न मिळाल्यास रिकामी हांव धरून आपल्या संततीवर रागाबूं नये.