या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा. ५१ किंवा त्यांस योग्य वळण लावावयाचे असल्यास, वडील मनुष्यांनीं विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांस मित्रत्वानें वागवावें, त्यांच्यावर फाजील दाब ठेवू नये, लयांचा कल खातंत्र्याकडे खाभाविक असतो, तो तसाच कायम ठेवून खातंत्र्याची खरी कल्पना त्यांच्या मनांत बिंबवून देण्याचा प्रयत्न करावा; व त्यांच्या उच्छृखल वृत्तीस हळूहळू जपून आळा घालावा. बाळपण व वृद्धपण यांच्यामधली पायरी-तरुणपण-ही आहे. एखाद्या समुद्रांत आरंभीं व अखेरीस चांगला रस्ता असून मध्यें मात्र भयंकर खडक असावे, तशी तरुणपणाची गोष्ट आहे. नाविकानें त्या खडकावर गलबत आपटू नये म्हणून काळजी घेतली, तर मात्र गलबत सुरक्षित तडीला लागेल; त्याप्रमाणेच आईबापांनीं या वयांत मुलांस संभाळून वागविल्यास, त्यांची पुढील जीवितयात्रा सुखाची होईल. त्यांच्या मनाप्रमाणें वागूं दिल्यास संतति बेताल होईल व आंपल्याच मताचा आग्रह धरल्यासही संतति बेताल होईल, याकरितां त्यांचे मन न दुखवितां, हळूहळू आपलें वळण त्यांस लावण्याकरितां जपून सौम्यपणानें प्रयत्न करावे, म्हणजे उभयतांचे हित होईल. आपण मुलांवर जुलूम करितों, अशी त्यांची भावना झाल्यास, ती जुळुमाचा प्रतिकार करूं लागतील, व त्यामुळे आईबापांच्या चांगल्या आज्ञाही तीं केव्हां केव्हां ऐकणार नाहीत. आपल्यास जें वर्तन चांगलें वाटेल, त्याची त्यांच्याजवळ प्रशंसा करावी, त्याचा चांगुलपणा त्यांस उघड करून दाखवावा; लया वर्तनानें ज्यांचा फायदा झाला असेल, त्यांचीं उदाहरणें त्यांस सांगावीं; व गोडीगुलाबीनें त्यांचीं मनें सत्कार्याकडे वळवावीं. ४७ मुलें करती झाली व ती आपल्याजवळ राहात असलीं, तर प्रपंचाचा थोडथोडा भार ल्यांच्यावर टाकीत जावा, म्हणजे तीही प्रपंचांत वाकब होतील; खांस रिकामा वेळ सांपडणार नाहीं, व ह्यांस वेडेवांकडे नादही लागणार नाहीत. किलेक आईबाप त्यांस काम तर सांगतच नाहीत, पण ‘ल्यांच्यानें तें व्हावयाचे नाहीं, मलाच केलें पाहिजे' असें म्हणून त्यांची रिकामी निंदा मात्र