या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा- ५३ संततीस चांगलें वळण आरंभापासून लागलेलें असल्यास, तीही आपलें कर्तव्य विसरणार नाहीं, व वृद्ध आईबापांस योग्य तें सहाय केल्याशिवाय राहाणार नाहीं. ४९ केव्हां केव्हां संतति झाल्यावर कोणी मनुष्य मेल्यास, किंवा आईबापांपैकी कोणी गत झाल्यास, त्याच्या मरणाचें अपेश संततीवर ठेवून, राहिलेलीं माणसें त्या संततीचा अव्हेर करतांना दृष्टीस पडतात. हा प्रकार तर फारच वाईट. ह्या संसारांत आधीं कोणी जावें व मागें कोणी राहावें, हें ठरलेलें नाहीं. बरें ठरलेलें असेल, तर तें चुकवितां येणार नाहीं. ज्याची वेळ येईल, तो जाईल. मागें राहाणारानें सर्व शोक बाजूला ठेवून आपलें कर्तव्य बजावलें पाहिजे. अहल्याबाईची मुलगी आपल्या नवच्यामागून सती गेली. आहल्याबाई नवच्याच्या मागें राहिली, तरी तिणे आपलें कर्तव्य योग्य रीतीनें बजावून, आपलें नांव हिंदुस्तानांतील राज्यकत्यांत संस्मरणीय करून ठेविलें. मागें राहाणारानें भलल्याच गोष्टीवर भरंवसा ठेवून आपलें मन कलुषित करून घेऊं नये. नाउमेद करणारे विचार मनास शिबूं देऊं नयेत. योग्य धैर्यानें आपलें कर्तव्य करीत असावें. विश्वकल्यास सर्व जगाची काळजी सारखीच आहे. त्यास हें जग चालवावयाचे आहे, त्याचा नाश करावयाचा नाहीं. त्याच्या मनांत आल्यास तो हें एका क्षणांत नाहींसें करील. त्याचें कर्तृत्व किंवा त्याच्या कर्तृत्वाचे हेतु, आपल्यास नीट किंवा लैौकर कळत नाहीत. पण आपलें कर्तव्य आपण योग्य रीतीनें बजावणें हें आपलें मुख्य काम आहे, तें आपण निरलसपणें करीत राहावें. संतति प्राप्त झाल्यास तिच्या जोपासनेंत कमतरता करूं नये. मुलगा झाला व वाप मेला, म्हणजे एखादी आई ह्या तान्हुल्यावर संतप्त होऊं लागते, पण हें चांगलें नाही. त्या तान्हुल्याला बाप नार्हसा झाला, तसा स्रीला पति नाहींसा झाला, यांत त्या एकट्या तान्हुल्याचे मात्र पातक काय ? असें कधीं म्हणतां येणार नाहीं. पतीचा भावी वियोग स्रीला सुखकर व्हावा, म्हणून त्या दयाळु