या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ आईबापांचा मित्र. विद्या शिकवी. यापलीकडे विद्येचा बहुतेक लोपच झाला. बहुतेकांची उडी साधारण लिहिणें वाचणें शिकणें, किंवा हिशेबठिशेब शिकणे, बेतापुरती भिक्षुकी शिकणें; किंवा पुराण सांगण्यास शिकणें, किंवा वाहाडी वैद्य तयार होणें, यापलीकडे जाईनाशी झाली. ४ मध्यंतरीं पेशवाईत ब्राह्मणांस दक्षिणा मिळू लागल्यामुळे, वेदाध्ययन व शास्राध्ययन करण्याकडे लयांचे लक्ष विशेष लागलें होतें, पण तें जातिविशेषापुरतेंच होतें. ५ इंग्रज सरकारचे राज्य झाल्यापासून ही स्थिति पालटली, त्यांनी सार्वजनिक शिक्षणाची योजना केली. बहुतेकांचे शिक्षण हृल्लीं याच मार्गानें चाललें आहे. आरंभीं आरंभीं थोडें बहुत इंग्रजी शिकल्यानें, मोठमोठ्या पगाराच्या जागा लोकांस मिळात्यामुळे, इंग्रजी शिकण्यावर लोकांच्या फार उड्या पडू लागल्या, च अातां तर त्या भाषेचे अध्ययन अगदीं अगल्याचे होऊन गेलें आहे. पंतोजींच्या ताब्यांत मुलें नियमित तास असत, तशीं आतांच्या मास्तरांच्या ताब्यांतही तीं नियमित तासच असतात. यामुळे मुलांवर आईबापांची नजर असणें त्यावेळीं अगल्याचे होतें, तसे हल्लींही अगलयाचे झालें आहे. मुलांवर शिक्षकांची नजर सर्वकाळ असावी, हें चांगलें. पण ती हल्लींच्या स्थितींत असणें शक्य नाही. तेव्हां ती घरीं आल्यावर त्यांच्यावर आईवापांची नजर असावी, हें योग्य आहे. यामुळे आपल्या मुलांवर नजर ठेवणे, हें आईबापांस एक नवें कर्तव्य उत्पन्न झाले आहे; म्हणून मुलांच्या शिक्षणाकरितां आईबापांनी काय करावें, हा प्रश्न उत्पन्न झाला. त्याबद्दल येथे चार शब्द लिहिण्याचे योजिलें आहे. ६ आपल्या देशांत अशिक्षित लोक पुष्कळ आहेत. शिक्षणाची थोडीबहुत आस्था बाळगणारे बरेच आहेत, पण शिक्षणाविषयीं विशेष आस्था बाळगणारे अगदीं कमी आहेत. तरी पण, आईबापनिीं शिक्षणाच्या कामांत मुलांस मदत करणें जर अगलयाचें आहे, तर त्याबद्दल चार शब्द लिहून ठेवण्यास कांहीं हरकत नाहीं. दिवसेंदिवस शिक्षणाकडे पुष्कळ लोकांचे लक्ष लागत चाललें