या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

년, नवी नवी उत्पन्न करणारी माणसें तयार झालीं पाहिजेत. त्यांनीं मॅीतिक शाखांचे शान संपादन करून, त्यांच्या द्वारें संपत्तीचे नवे व जिवंत झरे उत्पन्न केले पाहिजेत. या गोष्टीला कलियुग आह्यांला आडवें येणार नाहीं. मात्र सतत प्रयत्नावर आमचा दृढ भरंवसा पाहिजे. उदासीनपणा-कलियुगाचा जप-मात्र आपण अगदीं टाकून दिला पाहिजे. वेळ येईल तेव्हां होईल असें न ह्मणतां, दृढ व संतत प्रयलानें, ती वेळ आणतां येईल तितकी लैकर आणली पाहिजे. १२ संतति सर्वासच नसते. तरी ती ज्यांस लाभली असेल, त्यांनीं ती पुढे चांगली निपजावी, करती सवरती निपजावी, तिचे नांव जगांत चिरकाल राहील अशी ती असावी, ती *पाण्यांचीं पितरें? या संज्ञेस पात्र होणारी नसावी, अशाबद्दल योग्य प्रयत्न करावे, हें योग्य आहे. तसेंच संततीपासून होईल तेवढा सुखाचा लाभ त्यांनीं करून घ्यावा, आणि संततीचे खरें हित कशांत आहे, व ते आपल्यास कसें साधितां येईल, याचा विचार करावा; केवळ अविचारानें किंवा वृथाभिमानानें आपल्या वर्तनांत कांहीं दोष होत असल्यास ते टाळावे; आपल्या प्रेमास-वेडाचे रूप न देतां-विचाराचे रूप द्यावें, व आपल्या संततीस चांगले आईबाप बनविण्याचा प्रयत्न करावा, हेंही त्यांचे कर्तव्य आहे. १३ हें त्यांचे कर्तव्य त्यांस चांगल्या रीतीनें बजावतां यावें, त्यांच्या मनांत असलेलें संततिविषयक प्रेम दुणावावें, त्यांची इच्छा, कळकळ, हीं योग्य उपयोगाचीं व मुलांच्या व त्यांच्या हिताचीं व्हावीं, याकरितां त्यांस कांही गोष्टी सांगण्याचे योजिलें आहे. त्या त्यांस माहीत आहेतच. परंतु वेळेवर त्यांचा उपयोग व्हावा, ह्मणून एकत्र लिहून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ती त्यांनीं मान्य करून ध्यावा, व त्याचा होईल तेवढा उपयोग करावा, अशी त्यांस प्रार्थना आहे. तारिख ३ १ अगष्ट १ ९ १ १. } मोरो गणेश लोंढे.