या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

&く आईबापांचा मित्र. असें त्यांच्या मनांत कधींही येत नाहीं. हा शेवटला वर्गे जरी सोडून दिला, तरी बाकीच्या वर्गातील लोकांचीही समजूत, याबाबतींत चांगलीशी झालेली नसते. शिक्षण देण्याचे काम आईबापांचे आहे, तें त्यांनींच बजाविलें पाहिजे; मुलांच्या मनास वळण लावण्याचे काम आईबापांचे आहे, तें त्यांनींच केलें पाहिजे; अशी त्यांची दृढ समजूत झालेली नसते. हें केल्याशिवाय आईबापांचें कर्तव्य पुरें होत नाहीं, असें लयांसं वाटत नाहीं. पण हें बरोबर नाहीं. प्रजोत्पादनापासून होणाच्या सुखाबरोबरच ही जबाबदारी त्यांच्यावर पडते. पुढील उतारा पाहा:-“प्रजोत्पादनापासून सुख होईल तेवढे मात्र भोगावयाचे, व त्या मुलांचे पालन, पोषण, किंवा शिक्षण ह्यांची जबाबदारी लोकांवर टाकावयाची, असें मात्र कामाचें नाहीं. सुखोपभोग व त्याबरोबर अांगावर पडणारी जबा. बदारी, ह्या दोन्ही गोष्टींची नेहमीं सांगड असली पाहिजे.” आत्मनीतीचीं तत्वें-पृष्ठ १८१. ह्यावरून मुलांस शिक्षण देणें हें आईबापांचें कर्तव्य आहे, हें सहज लक्षांत येईल. ८ ‘अविद्य जीवनं शून्यं’ असें म्हटलें आहे. तेव्हां विद्या न शिकवितां, आपल्या मुलांचे जीवित असून नसल्यासारखें करण्याचें, कोणत्या आईबांपास बरें वाटेल ? जें काम आपण करूं. तें चांगलें होईल; तसें दुसच्यावर टाकून होणार नाहीं, हें त्यांच्या लक्षांत असेलच. याकरितां हजारों अडचणी दूर करून, मुलांचे शिक्षण आपल्या हातांत घेणें, आईबापांचें कर्तव्य आहे. पण निवाँहाचा धंदा करून, हें काम खतां करणे सर्व आईबापांस शक्य नाईt. परंतु मुलांच्या चालू असलेल्या शिक्षणावर तरी, योग्य ती देखरेख देवण्याकरितां, अवश्य ती खटपट त्यांनी केली पाहिजे. केवळ मुलें शाळेत जात आहेत, व तीं शिकत आहेत, एवढ्यावर ***** राहाणे चांगलें नाहीं. अशा करण्यानें त्यांचा त्यांनाच परताचा झाल्याशिवाय राहाणार नाहीं. पुढील उतारा पाहाः