या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. 4ৎ “परंतु परोपकाराच्या दृष्टीनें आईबापांच्या कर्तव्याचा विचार केला असतां, त्याची मर्यादा अधिक वाढविली पाहिजे. मानसिक शिक्षणाचे कांहीं भाग, शिक्षकांवर सोपविले असतां चालतील, परंतु कित्येक भागांकडे आईबापांनीं खतां लक्ष पुरविलें पाहिजे. बुद्धिविषयक शिक्षणाचा पुढील भाग, शिक्षकांवर सोपविण्यापासून फायदा आहे, परंतु त्या संबंधाचा आरंभींचा भाग व नीतिशिक्षणाला अंगभूत असें जें मनोविकारांचे (मनोवृत्तींचें) शिक्षण तें, हीं आईबापांनी आपल्या हातांत घेतलीं पाहिजेत.” आत्मनीतीचीं तत्वें-परोपकार-पृष्ठ १७८. ९ शिक्षणाकरितां मुलें शिक्षकाच्या हवालों केली, तरी देखील तीं नियमित वेळ मात्र शिक्षकाच्या ताब्यांत राहावयाचीं, बाकीचा त्यांचा वेळ आईबापांच्या समागमांत जावयाचा; त्या वेळेस त्या मुलांवर आईबापांची देखरेख असली पाहिजे. आईबापें सुशिक्षित असतील, तर त्यांनी आपलीं कामें करून शिल्लक राहिलेला वेळ, आपल्या मुलांच्या शिक्षणांत घालवावा. मुलांस चांगलें वळण लावण्याचे काम, आईबापांशिवाय कोणास करतां यावयाचे नाहीं. त्यांचे वर्तन चांगलें असलें, म्हणजे ती सहज सद्वर्तनी निघतील, तरी आईबापांची मुलांवर नजर हवीच. आईबापांस, प्रश्नोत्तरांच्याद्वारें पुष्कळ ज्ञान मुलांस करून देतां येईल, त्यांच्या चुका नाहींशा करतां येतील, त्यांस मदत करतां येईल. आईबापांशीं त्यांचा प्रेमसंबंध असल्यामुळे, आपलें मनोगत ती आईबापांजवळ जसें मोकळ्या मनानें सांगतील, तसें इतरांजवळ सांगणार नाहीत. यामुळे मुलांच्या मनांत कोणत्या गोष्टी घोळत आहेत, त्यांत चांगल्या किती आहेत, वाईट किती आहेत, चांगल्यांस मात्र स्थान मिळावें, वाईटांचे निर्मूलन व्हावें, याकरितां काय करावें, हें ठरवून त्याप्रमाणे त्यांस वागतां येईल; मुलांच्या शाळेतल्या शिक्षणास खांस मदत करतां येईल; याकरितां आईवापांनी, फावल्या वेळांत मुलांस अवश्य मदत करावी, व आपले लक्ष त्यांच्यावर ठेवावें.