या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Կ Շ आईबापांचा मित्र. धनी कोणासच होतां येत नाहीं, ही स्थिति समाधानकारक नव्हेथोडेंसें आरंभीचे शिक्षण झाल्यावर, पुढे ज्या धंद्यांत शिरावयाचे असेल, त्याला उपयोगीं पडणारें शिक्षण प्रत्येकास मिळेल, तर त्याला आपला धंदा ऊर्जितावस्थेस आणतां येईल; त्यांत सुधारणा करतां येईल; व तो धंदा आपल्या मुलांबाळांस फायदेशीर करुन दाखवितां येईल. - २५ उमेदवारी हल्लीं अगदीं बुडाल्यासारखी झाली आहे. पण आपणांस जो धंदा करावयाचा, त्या धंद्यांत उमेदवारी करणे अत्यंत फायद्याचे आहे. याकरितां शिक्षण संपल्यावर, अनुभविक मनुध्यांच्या हाताखालीं कांहीं दिवस अवश्य उमेदवारी करावी. कोणताही धंदा चांगल्या रीतीनें साधण्यास, त्यांतील जुन्या लोकांचा अनुभव आपणांस कळण्याची फार आवश्यकता असते, याकरिताँ आईबापांनी आपल्या मुलांस, ज्या धंद्यांत घालावयाचे असेल, त्य? धंद्यांत वाकब असणाच्या मनुष्यांच्या हाताखालीं, कांहीं दिवस उमेदवार म्हणून ठेवण्यास, आळस करूं नये. पुष्कळ नव्या मनुत्यांची-अनुभव नसतांना धंदा आरंभल्यामुळे-घांदल झालेली आपल्यास आढळते, याचे कारण उमेदवारीचा अभाव हें होय. २६ मुलांस पुढे जो उद्योग करावयाचा, त्याचे शिक्षण मिळालें पाहिजे. शिकून तयार झाल्यावर, ‘आतां मी काय करूं' असा प्रश्न उत्पन्न होऊन, त्यांस अडचण वाटतां उपयोगीं नाहीं. अशी अडचण वाटत असेल, तर त्यांस मिळालेलें शिक्षण हें खरें शिक्षण नव्हे, असें समजण्यास कांहीं हरकत नाहीं. नुसती मानसिक उन्नति झाल्यानें काम भागत नाहीं. आपल्या निर्वाहाचा भार कोणावर न घालतां, तो आपला आपण उचलू, अशी धमक संततीच्या आंगांत शिक्षणानें उत्पन्न झाली पाहिजे. अमुक मार्गानें मी गेलों, म्हणजे माझा निर्वाह मला करतां येईल, अशी धमक त्यांच्या आगांत उत्पन्न झाली पाहिजे. त्या मागोनें जातांना जे कष्ट पडतील, ते सोसण्यासारखें त्यांचे मन व शरीर ही तयार असली पाहिजेत. वाटेंत येणारे अडथळे टाळण्याकरितां, व नवे