या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

\So आईबापांचा मित्र. तानें प्रतिबंधक उपाय ताबडतोब योजितां येतील. याकरितां सामाजिक कामें एकजुटीनें कशीं करावीं, याचे शिक्षण संततीस मिळणें अगल्याचे आहे. तें शाळेत मिळेल तर सर्वांत उत्तम. कारण सर्व प्रकारचे शिक्षण देण्याचे खरें स्थान म्हणजे शाळाच ! असें दुसरें ठिकाण कोणतें आढळणार? पण तसें शिक्षण शाळेत मिळत नसेल, तर तें तसें तेथे मिळावें, याकरितां आईबापांनीं प्रयत्न करावे; नाहींतर आपण खतां तें द्यावें. ३३ एवढ्यानेंही आईबापांचें कर्तव्य संपत नाही. त्यांस याहीपेक्षां मोठे एक काम करावयाचे आहे, तें धर्मशिक्षणाचें. आपला धर्म म्हणजे काय, त्याची योग्यता किती आहे, ती आपण कां पाळावा, त्यांतील उत्तम तत्वें कोणतीं, ती आपल्यास योग्य रीतीनें कशीं पाळतां येतील, त्यापासून आपल्या जन्माचें सार्थक कसें करून घेतां येईल, याबद्दल आपल्या संततीस योग्य शिक्षण मिळालें पाहिजे. त्याची तजवीज शाळांतून थोडथोडी करतां येईल, तसें न जमल्यास तें काम आईबापांनीं बजाविलें पाहिजे. धर्म म्हणजे ढोंग नव्हे. बाहेरचे वर्तन किंवा शुद्धीकरण हा धर्माचा एक भाग म्हणतां येईल, पण तो धमीचा जीवात्मा नव्हे. धमोची मदार बाह्य देखाव्यावर नाहीं. तेथे अंतरंगाचे काम आहे. अंतरंग थोर कसें होईल, निर्मळ कसें होईल, त्याच्या द्वारें आत्म्याचे व परमात्म्याचें ज्ञान कसें होईल; आपला देह म्हणजे काय, जन्ममृत्यु म्हणजे काय, जन्म कशाकरितां मिळाला आहे, त्याचे सार्थक कसें होईल, तें करण्याचा मार्ग कोणता; आपल्यास जन्म कोणीं दिला, आपलीं येथलीं कर्तव्यें कोणतीं, या लोकी आपल्यास अक्षय राहावयाचे आहे किंवा कांहीं काळ मात्र राहावयाचे आहे; परलोक म्हणजे काय, तेथे आपण कसे पोंचूं, परलोकसाधनाचीं कर्तव्यं कोणती, जग हें काय आहे, तें कसें चाललें आहे, वगैरे ज्या गोष्टी मनुष्याच्या मनास अगदीं गोंधळून सोडतात, त्यांच्या अनिवा मुर्गही यांस होईल तेवढा खुला करून दिला पाहिजे. तात्पर्य ६तकंच कीं, आपल्या संततीला सर्व प्रकारें धन्य करण्याचे