या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

48 आईबापांचा मित्र. नाहीं, असें म्हणण्याची पाळी येणारच ! तेव्हां या गोष्टीस समाजाची हरकत येतां उपयोगीं नाहीं, याचा विचार आईबापांनीं अवश्य करावा. विवाह करावयाचा, म्हणून प्रखेक व्यक्ति विवाहित झाली पाहिजे, असा हट्ट धरणें चांगलें नाहीं. विवाह करणारांस, आपला उभयतांचा व मुलांबाळांचा निर्वाह पुढे चालवितां येईल, अशी खात्री असली पाहिजे. लग्नाकरितां वर्गणी करावयाची, संततीच्या कार्याकरितां वर्गणी करायाची, असा प्रकार असल्यास तो खुल्य कसा म्हणतां येईल ! आईबाप विवाह करोत किंवा ज्याचा तो विवाह करो, विवाह करण्यापूर्वी बराच विचार करावा. २१ आईबापांनी मुलांचीं लमें केल्यास व सून त्यांच्या हाताखालीं वागल्यास, सुनेस नम्रतेचें, कुलपरंपरागत वर्तनाचें, वळण लागेल; ज्याचा त्यानें विवाह केल्यास, ह्या गोष्टींच्या फायद्यास मुकावें लागेल. हल्लीं अविवाहित माणसें जरी फारशीं आढळत नाहीत, तरी समाजांत तशीं माणसें कांहीं असलीं, म्हणून हरकत नाही. त्यांनी आपलें वर्तन मात्र शुद्ध राखण्याची खबरदारी ध्यावी. सर्वानीं लौकर लमें करावीं, असें नाहीं. विवाहकाळ साघेल त्या मानानें लांबविणे चांगलें. मात्र भलल्याच वेळीं म्हणजे बरेंच वय होऊन गेल्यावर, लग्न करणें चांगलें नाहीं. लग्न अल्प वयांत झालें असलें, व मुलीस ऋतुप्राप्ति लैॉकर झाली असें आपल्यास वाटलें, तर संभोगकाल थोडाबहुत लांबविण्यास हरकत नाहीं. संतति होण्यापूर्वी, शरीरसंपत्तीची योग्य वाढ होईल तेवढी चांगली. २२ मुलींचा विवाह झालाच पाहिजे, या समजुतीमुळे आईबाप छल्याखुळ्या मुलींचेही विवाह करितात ! ही तर फारच वाईट गोष्ट आहे. यामुळे व्यंग संततीची समाजांत भर पडते. विवादास नवरा तयार नसल्यास, कोणास लग्न करण्यास-दुसरी बायको करण्यास-पैसे देण्याचे कबूल करून, नवन्यास लमापुरता उभी करतात ! मुलीचे लग्न झाल्यावर, तिच्या संरक्षणाचा बोजा