या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[९१]

 हा श्रमविभाग जसा जसा वाढत जातो त्या मानानेंच श्रमसंयोगही वाढत जातो. हीं दोन तत्वें परस्परारावलंबी आहेत अगर एकाच वस्तूच्या दोन बाजू आहेत असें ह्मटलें तरी चालल. हा संयोगही दोन तऱ्हेचा आहे. एक साधा व दुसरा संमिश्र, एक काम करण्याकरितां जेव्हां एकाच जातीचा पुष्कळ श्रम एकत्र आणावा लागतो तेव्हां त्याला साधा श्रमसंयोग ह्मणतात. ज्याप्रमाणें एखादं मोठं जड ओझें उचलण्यास दहावीस मजुरांचे श्रम एकसमयावच्छेर्देकरून एकवटावे लागतात. घर बांधण्यास पुष्कळ गंवडी, पुष्कळ सुतार, पुष्कळ मजूर लागतात, संमिश्र श्रमसंयोग ह्मणजे एक काम करण्यास जेथें निरनिराळ्या जातींच्या पुष्कळ श्रमांचा संयोग लागतो. ही श्रमविभागाचीच दुसरी बाजू आहे. एक टांचणी किंवा एक वाटी करण्यास दहाबारा निरनिराळ्या कारागिरांचे निरनिराळ्या प्रकारचे श्रम लागतात. हें श्रमसंयोगाचें तत्व सर्व समाजभर पसरलेलें आहे व जसजसा समाज सुधारत जातो तसतसा हा संमिश्रश्रमसंयोग वाढतच जातो. कित्येक क्रमिक पुस्तकांतून दिलेल्या " आश्चर्यकारक लाडू " च्या गोष्टींत हेंच तत्व गोवलेलं आहे. या उदाहरणावरून साधा श्रमसंयोग व संमिश्रश्रमसंयोग यांमधला भेदही चांगला व्यक्त होतो. एका गृहस्थानें आपल्या लहान मुलांना सांगितलें कीं, सणाच्या दिवशीं मी तुह्मांला हजार लोकांनीं केलेला लाडू नजर देणार आहे. ‘हजार लोकांनीं केलेला लाडू ' हे शब्द ऐकतांच मुलांना वाटलें कीं, हा लाडू ह्मणजे डोंगराएवढा किंवा निदान टेकडीएवढा तरी मोठा असला पाहिजे. म्हणून मुलें या लाडुची मार्गप्रतीक्षा मोठ्या उत्कंठेनें करीत बसली. सणाच्या दिवशीं त्या गृहस्थानें नेहमींच्या आकाराचे नेहमींसारखेंच दिसण्यांत असे लाडू मुलांना नजर केले. मुलें ते लाडू घेऊन आश्चर्यचकित झाली. तेव्हां त्या गृहस्थानें मुलांस पाठीपेन्सिल घेण्यास सांगून ते लाडू बनविण्यांत किती लोकांचे श्रम कारणीभूत झालेल आहेत हैं टिपण्यास सांगितलें व मोजतां मोजतां ही संख्या हजारांच्याही वर् गेली.तेव्ह त्या गृहस्थानें हे लाडू हजार लोकांच्या श्रमानें कसे झालेले आहेत हैं मुलांना समजावून दिले. यावरून ज्या ज्या मानानें समाजामध्यें सामाजिक व औद्योगिक श्रमविभाग वाढेल त्या त्या मानानें संमिश्रश्रमसेयोगही वाढलाच पाहिजे. अर्वाचीन काळीं तर औद्योगिक, बाबतींत सर्व जगामध्य