या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[९४]

आरोग्यकारक परिस्थिति नसल्यामुळें मजुरांना निरोगी राहतां येत नाही व त्यांचे हाल वाढतात. तसेंच एखाद्या नव्या यंत्राच्या शोधानें हजारों लोकांना एकदम काम नाहींसें होतें.
 परंतु या तोट्यालाही प्रतिकार आहेत हें ध्यानांत ठेविलें पाहिजे. हल्लीं सुधारलेल्या सर्व राष्टांत शहरसुधराईचे प्रयत्न जोरानें चालले आहेत. त्यामुळें शहरांत राहण्यापासून होणारे तोटे बरेच कमी झालेले आहेत. या शहरांच्या आरोग्यसुधारणेच्या कामांत सुधारलेलीं सरकारें व म्युनिसिपालिटया लाखों रुपये रवर्च करीत आहेत. शहराला उत्तम शास्त्रीय पद्धतीचीं गटारें करणें; शहराला उत्तम व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणें; सर्व शहरांत हवा उत्तम तऱ्हेनें खेळेल अशी शहराची रचना करणें; शाहरांत उघाणभूमिका राखून ठेवणें; चांगला व निकोप माल शहरवासीयांस मिळेल अशी तजवीज करणें; अशा प्रकारच्या किती तरी गोष्टी अर्वाचीन काळीं होत आहेत. याचा सुपरिणामही दिसून येत आहे. सर्व सुधारलेल्या देशांत शहरांतील दर हजारीं मृत्युसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. यावरून या आक्षेपांतही फारसा तथ्यांश नाहीं हें उघड आहे.

भाग आठवा.


मोठ्या प्रमाणावर व अल्प प्रमाणावर उत्पातेि.


 श्रमविभागाच्या तत्वानें संपत्तीच्या उत्पत्नीच्या वाढीत विलक्षण फरक कां व कसा होतो, याचें विवेचन मागील भागांत केलें. परंतु कोणत्याही घंघांत हा श्रमविभाग अमलांत येणें हें मालाच्या खपावर अवलंबून आहे. कारण घंघांच्या क्रियेचे विभाग करून एक एक क्रिया एक एक माणूस करूं लागला म्हणजे माल अतोनात तयार होणार. हा माल जर ताबडतोड खपला गेला नाहीं तर हा श्रमविभाग होणें शक्य नाहीं. या भागात विचार करावयाच्या विषयाचाही श्रमविभागाशीं निकट संबंध