या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१०३]

करणारे मजूर हे निवळ सांगकामे असतात. त्यांची आपल्या कामावर आसत्कि नसते. कारण काम काळजीनें करण्यापासून त्यांचा फायदा नसतो. ठरलेल्या मजुरीपलीकडे त्यांना जास्त फायद्याची आशा नसते. यामुळे विस्तीर्ण शेतींत पुष्कळ श्रम वांया जातात. परंतु अल्प शेतींत शेतकऱ्याला मालकीची जाणीव असते व या मालकीच्या जाणीवेनें ते आपल्या शेतीची अतोनात काळजी घेतो; तो काटकसर करतो; लहानसहान गोष्टींकडे सुद्धांदुर्लक्ष करीत नाही; आपल्या शेतीची आपण जितकी मशागत करूं तितका आपलाच फायदा आहे अशी त्याची खात्री असते; यामुळें अल्प शेतीमध्यें शतीपासून शेतीची संपत्ति जास्त उत्पन्न होते असें अल्प शेतीच्या समर्थकांचें म्हणणें आहे; परंतु या विषयाचा विचार या ग्रंथाच्या तिसऱ्या पुस्तकांत करावयाचा आहे, तेव्हां सध्याचें विवेचन येथेंच थांबविणें बरें.

[भाग नववा.]
[उतरत्या व चढत्या पदाशींचा सिद्भांत व त्याचें विवरण.]

 संपत्तीच्या उत्पत्तीचीं कारणें व त्या कारणांचा संयोग ज्या तत्त्वांनीं होतो त्याचा येथपर्यंत विचार झाला. आतां प्रत्येक कारणाची वृद्धि कशी होते हैं पहावयाचें राहिलें, तें या पुस्तकाच्या राहिलेल्या चार भागांत उरकावयाचा विचार आहे.
 संपत्तीच्या उत्पत्तीचें पहिलें कारण म्हणजे देशांतील जमीन व स्रष्टीशक्ति हें होय. आतां देशांतली जमीन कांहीं प्रत्यक्ष आकारानें वाढूं शकत नहीं हैं खरें. तरी पण जमिनीपासून कमी अधिक उत्पन्न काढतां येतें. या बाबतींतच मथळ्यांत निर्दिष्ट केलेल्या सिद्धांताचा शोध लागला व याच सिद्धांतावर अर्थशास्त्रांतील व विशेषतः वांटणी या भागांतील कित्येक प्रमेयें व विधानें अवलंबून आहेतू तेव्हां या सिद्धांताचा येथें विचार करणें प्राप्त आहे. चढत्या् व उतरत्या पैदाशीचा नियम प्रथमतः