या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१०४]

शेतकी व इतर उद्योगधंदे यांचा भेद दाखविण्याकरितां प्रतिपादन केला जात असे. अभिमत अर्थशास्रकारांचें असें ह्मणणें आहे कीं, उतरत्या पैदाशीचा नियम शेतीस लागू आहे व इतर धंद्यांस चढत्या पैदाशीचा नियम लागू आहे. या नियमांचा अर्थ व त्यांतील भेद खालील एका उदाहरणावरून स्पष्ट होईल.
 समजा, एका शेतक-यानें १० एकर जमिनीच्या तुकड्याची मशागत १०० रुपये भांडवल व २५मजुरांचे श्रम लावून केली व त्यांत धान्य पेरलें तर त्याला कांहीं एक धान्याची पैदास होईल. आतां शेतक-यानें त्याच जमिनीच्या तुकड्यांतून जास्त पैदास करण्याकरितां आणखी १०० रु. भांडवल व २५ मजुरांचे श्रम त्या जमिनीला लावले तर त्याला उत्पत्राची पैदास पहिल्यापेक्षां जास्त होईल; परंतु ती पहिल्याच्या दुप्पट होणार नाहीं. समजा, त्या शेतक-यानें तिस-या वर्षी भांडवल व श्रम हे पहिल्यापेक्षां आणखी १०० रुपयांनीं व २५ मजुरांच्या श्रमानें वाढविले ह्मणजे या वर्षी ३०० रु. व ७५मजुरांचे श्रम इतके त्या जमिनीला लावले तर त्याचे उत्पन्नाची पैदास दुस-या वर्षांपेक्षां जास्त होईल; परंतु कमी प्रमाणानें जास्त होईल. ह्मणजे पहिल्या १०० रुपयांच्या भांडवलापासून व २५ मजुरांच्या श्रमापासून जितकी पैदास जास्त झाली त्यांपेक्षां दुस-यापासून कमी होईल व दुस-यापासून जितकी पैदास झाली त्यापेक्षांही कमी तिस-यापासून होईल. भांडवल व श्रम हे कांहीं प्रमाणाच्या पलीकडे गेल्यास निरुपयोगी होतील इतकेंच नव्हे तर सर्व शेताचा फाजील खतानें नाश हेोईल व सर्व उत्पन्न बुडून जाईल. यालाच उतरत्या पैदाशीचा नियम म्हणतात. ही झाली एकाच जमिनीच्या तुकड्याची मशागत करण्याची स्थिति. हाच नियम देशांतील सर्व विस्तीर्ण जमिनीस लागू आहे. देशातील सर्व जमिनी सारख्या सुपीक नसतात; कांहीं जास्त सुपीक व कांहीं कमी सुपीक व कांहीं तर अगदीं नापीक असतात. यामुळे येथेंही उतरत्या पैदाशीचा नियमु लागू पडतो. ह्मणजे सुपीक जमिनीवर भांड्वल श्रम यांचें कांहीं एक प्रमाण किंवा माप खर्च केले तर जी उठूनची पैदास होते त्यापेक्षां कमी पैदास तितकेंच माप कमी सुपीक जमिनीवर खर्च केल्यापासून होते व नापीक जमिनीवर तेंच माप खर्च केल्यानें खर्चाइतकीही पैदास होण्यास पंचाईत पडते. या उतरल्या पेद्रा