या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१०५]

शीच्या नियमामुळे सर्व देशांत शेतीच्या मालाच्या किंमती नेहेमीं वाढत जातात. कारण जसजशी जास्त जमीन लागवडीस येते-वही जमीन अर्थातू पहिल्यापेक्षां कमी सुपीक असते-तसतसें उत्पत्तीच्या खर्चचें प्रमाण वाढतें व पैदाशीचें प्रमाण कमी होतें व म्हणून त्या उत्पन्नाची किंमत वाढत जाते. त्याचप्रमाणें जमिनीची जसजशी जास्त मशागत होत जाते तसतसा उत्पत्तीचा खर्च वाढतो व पैदाशीचें प्रमाण कमी होतें व ह्मणूनच या अधिक खचनेिं तयार झालेल्या मालाची किंमत वाढत जाते. यावरून असें अनुमान निघतें कीं, देशाच्या आधिभौतिक भरभराटीबरोबर खाण्याचे पदार्थ महाग होत जातात व मनुष्याला निवळ जीवनास जास्त जास्त खर्च लागू लागतो.
 परंतु उद्योगधंद्याची याच्या उलट स्थिति आहे. त्याला चढत्या पैदाशीचा नियम लागू आहे. समजा, एका कारखानदारानें १० हजार रुपयांवर एक धंदा काढला आहे. यानें जर आपले भांडवल २० हजार करून एक जास्त मोठं यंत्र आणलें व धंद्यामध्यें श्रमविभाग जास्त अंमलांत आणला तर त्या धंद्यांतील मालाची पैदास दुपटीपेक्षां जास्त होईल. आणखी कांहीं काळानें त्या कारखानदारानें आणखी १० हजारांनीं आपलें भांडवल वाढविलें व श्रमाची काटकसर करणारें आणरवी एक दुसरें यंत्र आणविलें तर मालाची पैदास जास्त पटीनें वाढेल. सारांश जस जसा धंदा विराटस्वरूपाचा करावा तसतशी मालाची पैदास जास्तच वाढत जाते, हा नियम ह्मणजे श्रमविभागाच्या तत्वाचें व विराटस्वरुपी कारखान्याच्या तत्वाचें उलट बाजूनें विवरण करण्यासारखें आहे. या नियमाचा इत्यर्थ हा कीं, भांडवलाच्या वाढीच्या प्रत्येक मापाबरोबर पैदाशीचें प्रमाण त्याहून जास्तच वाढत जातें. यालाच चढत्या पैदाशीचा नियम म्हणतात. याच्या परिणाम असा होती कीं, देशामध्यें जसुजशी मालाला मागणी वाढते व जसजसेंधंद्यात जास्त जास्त भांडवल घातलें जातें तसतसें पैदाशांचें प्रमाण वाढत जातें व म्हणूनच माल उत्पन्न करण्याचा खर्च कमी कमी होत जातो व माल स्वस्त होऊं लागतो. म्हणजे संपत्तीचे जे सामान्यत: तीन वर्ग करण्यांत येतात, त्यांच्या किंमतीची वाढ व्यस्त प्रमाणानें होते. अवश्यक, सोई व चैनी अशा तीन प्रकारच्या संपत्ति आहेत. तेव्हां चढत्या व उतरत्या पैदाशीच्या नियमानुरूप देशाची लोकसंख्या वाढत चालली व त्याची