या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१०९]


पशुभिर्नराणाम् ? या प्रसिद्ध सुभाषितांत या दोन्ही प्रवृत्तींचा उल्लेख आलेला आहे व या दोन्ही प्रवृत्ति, वासना किंवा गरजा सर्व प्राणिमात्रांमध्यें दिसून येतात इतकेंच नाहीं तर मनुष्याच्या अगदीं रानटी स्थितीपासून तों सुधारलेल्या स्थितीपर्यंत सर्व अवस्थांमध्यें ही प्रवृत्ति सारखीच दृष्टोत्पत्तीस येते व मनुष्याची जेथपासून आपल्याला मुाहिती उपलब्ध झाली आहे त्या जुन्या काळापासून आजपर्यंतच्या हजारों वर्षांच्या अवधीत या प्रवृत्तीमध्यें म्हणण्यासारखा फरक झालेला नाहीं. लग्नाची वासना नसलेल्या कांहीं व्यक्ति सर्व काळीं व सर्व ठिकाणीं दृष्टीस पडतात; परंतु अशा व्यक्ति अपवादादाखल होत. त्यावरून मनुष्यजातीच्या सामान्य प्रवृत्तीला बाध येत नाहीं. या दोन गोष्टी निर्विवाद आहेत हें कबूल झालें म्हणजे मॅलथसच्या लोकसंख्येच्या मिमांसेविषयीं फार वाद राहत नाहीं. या मीमांसेचें सर्व रहस्य खालील तीन विधानांत गोवलेलें आहे. देशांतील लोकसंख्या ही उपजीविकेच्या साधनांनीं अवश्यमेव मर्यादित झालेली । असते. ह्मणजे उपजीविकेच्या साधनांच्या पलीकडे लोकसंख्येची वाढ होणें शक्य नाहीं. उपजीविकेच्या साधनांत फक्त अन्न व उदक इतकेंच येतें असं नाहीं. ज्या गेौटीं समाजांत प्रत्येक माणसाला अत्यंत अवश्यक गणल्या जातात त्या सर्वांचा समावेश उपजीविकेच्या साधनांत केला पाहिजे. आतां या ज्या उपजीविकेला अत्यंत अवश्यक गोष्टी त्यांच्या प्रमाणापलीकडे लोकसंख्या वाढू शकणार नाहीं हें उघड आहे. या गोष्टींपेकीं धान्य हें प्रधान अंग होय हेंही स्पष्टच आहे. परंतु पुष्कळ दिवस वसाहत केलेल्या देशांत व जेथें जमीनीच्या सुपीकतेची पराकाष्ठा होऊन । गेली आहे अशा देशांत उतरत्या पैद्राशीचा नियम लागू असतो व म्हनूनच धान्याची पैदास वाढण्यास श्रम व भांडवल हे जास्त जास्त लागू लागतात. या गोष्टी मनांत धरूनच मॅलथसनें मनुष्याची वाढ भूमितिश्रेढनें होते असें ह्मटलें आहे. वास्तविक सर्व सजीव वस्तूंना. भूमिति श्रेधींचे प्रमाण लागू आहे. सर्व वनस्पति व प्राणिमात्र यांमध्यें सृष्टीनें उत्पादनशक्ति इतकी जबरठेविली आहे कीं, या वाढ °° परि- - स्थित असल्यास एका वनस्पतीच्या बीजापासून थोड्या काळांत सूर्व पृथ्वी भरून टाकतां येईल. नवीन वसाहतीमध्यें जीं जनावरें पूर्वी नव्हतीं उदाहरणार्थ, आस्ट्रेलियांत बकरीं घ्या-त्यांच्या थोड्याशा बाहेरून नेलेल्या.