या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१२२]

नाहीं. ही अदूरदृष्टी किंवा अविचार मुलें, रानटी लीक, गरीब लोक व उडाणटप्पू लोक या सर्वांमध्यें दृष्टीस पडते. दूरदृष्टिपणाची वाढ ही भांडवलाच्या वाढीस अनुकूल आहे हें मागें दिलेल्या भांडवलाच्या मूळ कल्पनेवरूनही दिसून येईल. अप्रत्यक्षपणें किंवा प्रत्यक्षपणें भावी वासनांची तृप्ती करण्याकरितां राखून ठेविलेली संपत्ति अशी भांडवलाची मूळ कल्पना आहे, परंतु अशी तरतूद करण्याची नेहमींची संवय म्हणजेच दूरदृष्टि होय.
 शिल्लक टाकण्यास दुसरी अनुकूल गोष्ट म्हणजे टिकाऊ संपत्तीचें अस्तित्व होय. मृगयावृत्ति माणसाला दूरदृष्टि असली तरी शिकार फार दिवस राहणें शक्य नसतें. यामुळें त्याला शिल्लक टाकण्याची बुद्धि होत नाहीं, व बुद्धि झाली तरी तिचा तादृश उपयोग नसतो. कारण, शिकारीचें फळ थोड्या काळांत नासून जाणारें असतें. त्या काळींं कातडींं वगैरे टिकाऊ असतात खरीं, परंतु कातडींं कमावण्याची कला मृगयावृत्ति माणसाला ठाऊक नसते. परंतु मनुष्याच्या गरजा या काळीं फार कमी असतात व लोकवस्ती फार कमी असल्यामुळें मृगया न मिळण्याची केव्हांही धास्ती नसते. यामुळें भावी वासनांची तरतूद करण्याची त्या काळीं मनुष्यास जरूरी नसते व तितकी त्याची कल्पनाशक्तिही वाढलेली नसते. म्हणून त्या वृत्तीमध्यें समाजांत संपत्ति व भांडवल हीं दोन्हींही उत्पन्न होऊं शकत नाहींत. गोपालवृत्ति समाजांतील संपत्ति गुराढोरांची व शेळ्यामेंढ्यांची असते व या संपत्तीची वाढ आपोआप नैसर्गिक क्रमानेंच होते. येथें सर्व संपत्ति ही भांडवलही असते, व मनुष्याच्या श्रमाखेरीज पशूरूपी संपत्ति आत्मसदृश संपत्तीला प्रसवते. यामुळें या समाजाच्या स्थितींंत जरी दूरदृष्टीची फार वाढ झाली नाहीं तरी नैसर्गिक कारणांनींंच प्रत्येक मनुष्याची संपत्ति वाढत जाते. कृषिवृत्ति समाजांत मात्र संपत्तीची वाढ ज्याप्रमाणें झपाट्यानें होते त्याचप्रमाणें भांडवलाचीही वाढ झपाट्यानें होऊं लागते. कारण या स्थितींत पुष्कळ टिकाऊ संपृत्तीचे प्रकार अस्तित्वांत आलेले असतात व मनुष्याच्या अवश्यकापैकीं मुख्य जें धान्य तेंही पुष्कळ कांळपर्यंत टिकूं शकतें व म्हणून दुष्काळासारख्या आपत्तींंत उपयोगी पडण्याकरितां धान्य पुरून ठेवण्याची पद्धति सुद्धां अमलांत येते. तरी पण धान्य हें थोड्या फार कालानें नास-