या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१२३]

णारेंच आहे. शिल्लक टाकण्याच्या प्रवृत्तीला सोन्यारुप्याच्या नाण्याच्या प्रसारापासून जास्त उत्तेजन मिळतें. कारण, सोनेंरुपें व त्यांचींं नाणींं हीं अत्यंत टिकाऊ संपति आहे. तशीच ठेवल्यानें किंवा पुरून ठेवल्यानें ती नासत नाहीं, गंजत नाही किंवा कमी होत नाहीं. शिवाय नाणी किवा पैसा हा सर्व सपत्तीचा विनिमय-सामान्य असल्यामुळें कव्हांही त्याच्या मोबदला आपल्याला पाहिजे ती माल मिळतो. तसेंच नाण्याचें मोलही स्थिर असल्यामुळें पैसे शिलुक टाकल्यानें आपलें नुकसान केव्हांही होण्याचा संभव नसतो. आपण खर्च केलल मोल केव्हांही आपल्याला परत मिळतें. परंतु उद्योगवृत्ति समाजांत पैशापेक्षां आणखीही एक नवीन साधन शिल्लक टाकण्याचें तयार होतें, तें साधन म्हणजे सरकारी प्राॅमिसरी नोटा, निरनिराळ्या खासगी व सार्वजनिक संस्थांचे शेअर्स व डिबेंचर्स होत. या रूपानें शिल्लक टाकण्यापासून व्यक्तीचा व समाजाचा असा दुहेरी फायदा होतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या शिलकेपासून वार्षिक उत्पन्न मिळूं लागतें व देशांतील शिल्लक पैसा नाण्याच्या रूपानें अनुपयुक्त न राहतां उत्पादक भांडवलाच्या रूपानें देशांतील उद्यागधंद्यांची वाढ करतो.
 भांडवल वाढण्यास शेवटली अनुकूल गोष्ट म्हणजे शिल्लक टाकण्यास उत्तेजन देणा-या संस्था होत. पेढ्या, सहकारी पतपेढ्या, मजुरसंघ, परस्पर सहकारी मंडळ्या, आयुष्याचा विमा उतरणा-या मंडळ्या वगैरे प्रकारच्या संस्था या प्रत्यक्षपणें व अप्रत्यक्षपणें मनुष्याला संपत्ति शिल्लक टाकण्यास व काटकसर करण्यास उत्तेजन देणाऱ्या संस्था आहेत. देशामध्यें अशा संस्थांचा जितका जितका जास्त प्रसार होईल तितकें तितकें भांडवलाच्या वाढीस उत्तेजन मिळतें असा सार्वत्रिक अनुभव आहे. अशा संस्था निघणें हा लोकांच्या काटकसरीच्या प्रवृत्तीचा परिणाम आहे. अर्थात् या दोन्ही गोष्टी परस्परावलंबी आहेत. म्हणजे पहिल्याचा परिणाम दुस-यावर होतो व दुस-याचा परत पहिल्यावर होतो. ज्याप्रमाणें मालाचा पुरवठा व खप या परस्परावलंबी गोष्टी आहेत तसाच येथें प्रकार आहे. देशांत जसजशा असल्या संस्था वाढतात तसतसें देशांत भांडवलाच्या वाढीस उतेजन मिळतें व देशांत जसजसें भांडवल वाढूं लागतें तसतशा अशा संस्थ वाढूं लागतात. या संस्थांपैकी ब-याच संस्थांचें पुढील पुस्तकांमध्यें योग्य प्रसंगीं वर्णन यावयाचें आहे. तेव्हां संस्थांच्या नामनिर्देशापलीकडे व