या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अर्थशास्त्राची मूलतत्वें.



पुस्तक तिसरें.
भाग १ ला.
वांटणी.

 दुस-या पुस्तकांत संपत्तीची उत्पत्ति व तिचें स्वरूप आणि नियम यांचा विचार झाला. आतां अर्थशास्त्रांतील "संपत्तीची वांटणी" या विषयाचा या भागांत ऊहापोह करावयाचा आहे. संपत्तीची 'उत्पत्ति' संपत्तीची 'वांटणी' व संपत्तीचा 'विनिमय' असे अर्थशास्त्राचे तीन भाग करण्याचा जो सांप्रदाय आहे तो विवेचनाच्या सोईसाठीं पडलेला आहे. वास्तविक हे भाग अगदीं परस्पर संलग्न आहेत; इतकेंच नाहीं तर परस्परावलंबीही आहेत, हें या ग्रंथाच्या प्रास्ताविक पुस्तकांत दाखविलेंच आहे. हे भाग सोईसाठींच केलेले असल्यामुळे पुष्कळ अर्थशास्त्रज्ञांच्या विवेचन पद्धतीत फरक दिसून येतो, काहीं अर्थशास्त्रकार विनिमयाचा विषय आधीं विवेचनास घेऊन मग वांटणीचा घेतात; कांहींजण तर 'वांटणींचा अन्तर्भाव' विनिमयांत' करतात. कारण हे असें ह्मणतात कीं, हल्लीं सुधारलेल्या राष्ट्रांमध्यें संपत्तीची वांटणी विनिमयानेंच फक्त होते. मजूरदार आपल्या श्रमाबद्दल कांही तरी मोबदला घेऊन ती दुस-यास विकत देतो. जमीनदार आपली जमीन भाडें घेऊन कसणारास देतो. सारांश, ज्याच्याजवळ संपत्ति किंवा संपत्तीस लागणारें एखादें साधन आहे तो ती संपत्ति किंवा तें साधन अदलाबदलीनें दुस-यास देऊन आपल्यास लागणारी संपत्ति अगर साधन