या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१३६]

 मिल्लच्या मतें संपत्तीच्या उत्पत्तीचे नियम हे नैसर्गिक सृष्टिनियमाच्या जातीचे आहेत. ह्मणजे त्यामध्यें मानवी कृतीनें ह्मणण्यासारखा फरक करतां येण्याजोगा नाही. जमिनीच्या उतरत्या पैदाशीचा नियम, संपत्नीच्या उत्पतीचीं नैसर्गिक साधनें, शास्त्रीय ज्ञान व शोध वगैरे गोष्टी मनुष्याच्या हातच्या नाहीत. यामुळें मनुष्याला आपल्या इच्छेप्रमाणें वाटेल तेव्हां संपत्तीची वाढ हवी तशी करता येणें अशक्य आहे. ह्मणजे उत्पत्तीचे नियम हे मानवीशक्तीबाहेरील सृष्टिनियमांसारखे आहेत. परंतु संपत्तीच्या वांटणीचे नियम हे मनुष्यकृत व समाजकत आहेत. एकदां संपत्ति उत्पन्न झाली म्हणजे तिची वांटणी अगर हिस्सेरशी रूढीनें व सरकारी कायद्यानें हवी तशी करतां येईल. अर्थात संपत्तीच्या वांटणीचे नियम त्रिकालाबाधित सृष्टीनियामाच्या जातीचे नाहीत; त्यांमध्यें समाजाला व सरकारला पाहिजे तसा फरक करतां येण्यासारखा आहे. तेव्हां संपत्तीच्या वांटणीचे नियम सर्व समाजास सर्व काळीं सारखेच लागू असतात असें नाही. तर ते पुष्कळ अंशीं रूढींवर व समाजाच्या कायद्यावर अवलंबून असतात.यामुळें या नियमांत जर कोठें असमता किंवा अन्याय असेल तर तो नाहींसा करण्याचा अधिकार समाजास व सरकारस आहे, असें मिल्लचें म्हणणें आहे.
 तेव्हां संपत्तीच्या उत्पतीचे नियम नैसर्गिक असल्यामुळें संपत्तीचा उत्पत्तीच्या बाबतींत सरकारने ढवळाढवळ करून संपत्ति वाढविणें शक्य नाही म्हणून उद्योगधंद्यांच्या बाबतींत समाजानें तटस्थ रहावें ह्यांत समाजाचें हित आहे; परंतु संपत्तीच्या वांटणीचे नियम हे मुळीं मनुष्यकृतच असल्यामुळें समाजानें त्यांत हात घालून ढवळाढवळ केली तरी हरकत नाही; असें उत्पत्ति व वाटणी यांमधील भेदावर जोर देऊन दाखविण्याचा मिल्लचा हेतू होता. यात्याच्या मतामुळें मिल्लनें सामाजिक पंथाच्या पुष्कळ सुधारणांचें समर्थन केलेलें आहे. संपत्तीच्या वांटणीचे नियम हवे तसे फिरविले तरी संपत्तीच्या उत्पत्तींत फरक पडणार नाही, ही गोष्ट मिल्लने या वादांत गृहीत धरली आहे. या पुस्तकांच्या प्रास्ताविक भागांत वांटणी व उत्पत्ति या परस्परावलंबी गोष्टी आहेत,असे दाखविले आहे. त्यावरून मिल्लचे म्हणणें सर्वांशी खरें नाहीं असे दिसून येईल. शिवाय मिल्लच्या या मतानें सरकारला हवा तो कायदा करून तो अंमलांत