या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१६२]

करणारांना मजुरी जास्त यावी लागते. उदाहरणार्थ, भंगी, मोऱ्या व गटारें साफ करणारे लोक. तसेंच जो धंदा समाजामध्यें हलकट समजला जातो त्याची मजूरी जास्त असते. उदाहरणार्थ, आमच्या समाजांत मास्तरापेक्षां आचाऱ्याची मजूरी जास्त आहे.
 दुसरें--धंद्याचा निश्चितपणा किंवा अनिश्चितपणा. ज्या धंद्याचें काम नेहेमीं बारा महिन्यांचें व निश्चित असतें त्याची मजूरी याच्या उलट प्रकार असणाऱ्या धंद्यांपेक्षां कमी असते. शेतकामी मजुराला कांहीं हंगामांतच काम असते. म्हणून त्या हंगामांत त्याची मजूरी जास्त असते. गंवडी, पाथरवट वगैरे कामदारांचें काम भरपावसांत चालूं शकत नाहीं. यामुळें त्यांना कांहीं दिवस रिकामें बसावें लागतें व ह्मणून त्यांना जेव्हां काम मिळतें तेव्हां त्यांची मजूरी जास्त असते. तसच हंगामी लागणारे एंजिनीयर वगैरे जिन्स व प्रेसमधले लोक यांना आठमहिने पगार जास्त द्यावा लागतो. सारांश, ज्या धंद्याचें काम सारखें वर्षभर चालू असून काम मिळण्याची शाश्वती असते त्या धंद्यांत इतर हंगामी व अनिश्चित कामाच्या धंद्यांपेक्षां मजुरी कमी असते.
 तिसरें-धंद्यांतील मजुरी धंदा शिकण्यास लागणारा खर्च व धंद्याचा कठीणपणा यांवर अवलंबून असते. अडाणी मजूर व हुशार मजूर यांच्या मजुरीमधील फरक या तत्वानेंच उत्पन्न होतो. अडाणी मजुरास धंदा शिकण्यास खर्चही लागत नाहीं किंवा त्रासही पडत नाहीं. त्याचें काम ह्मणजें सांगकाम असतें. परंतु हुशारीचीं कामें करण्यास कठीण असून ता शिकण्यास खर्चही पुष्कळ होतो ह्मणून अशा मजुरांना जास्त मजुरी द्यावी लागते. कांही धंद्यांची कला अवगत करून घेण्यास तपेचीं तपें लागतात.म्हणून त्या धंद्यातील मजुरी फारच मोठी असते.परंतु खर्च व त्रास या मानानें जास्त नसते. ज्यांना बौद्धिक धंदे म्हणतात-उदाहरणार्थ, वकिली, एंजिनिअर, शिक्षक आणि डॉक्टरी-या धंद्यांत प्राविण्य मिळविण्यास फार श्रम, खर्च व त्रास सोसावा लागतो. यामुळें या धंद्यांतील मजुरी ही बरीच मोठी असावी लागते.
 चवथें-धंदेवाल्यावर ठेवावा लागणारा विश्वास. पेढीवाले, सोनार व इतर मोल्यवान पदार्थांची कामें करणारांची मजुरी जास्त असावी लागते. कारण सर्वांवर विश्वास टाकणें शक्य नसतें; व ह्मणून जे विश्वासाने वाग-