या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१७२]

 कांहीं अर्थशास्त्रकारांचें म्हणेणें असें आहे कीं, नका हा संपत्तीचा एक स्वतंत्र वांटा आहे असें मानण्याचें कारण नाहीं. कां कीं, नफा म्हणज वास्तविक कारखानदार किंवा व्यापारी यांच्या श्रमांचा मोबदला होय व श्रमाचा मोबदला म्हणजे मजुरी होय. तेव्हां इतर मजुरदार व कारखान दार किंवा व्यापारी यांचेमध्यें फरक मानण्याचें कांहीं एक कारण नाहा व म्हणूनच मजुरी व नफा असे संपत्तीचे दोन स्वतंत्र वांटे मानण्याचेंहीं कारण नाहीं.
 परंतु कारखानदारांमध्यें कोणकोणते विशेष गुण लागतात व कारखानदार म्हणून एक संपत्तीचें कारण मानणें कसें इष्ट आहे हें मागे दुसऱ्या पुस्तकांत दाखविलेंच आहे. मजूर व कारखानदार किंवा व्यापारी हे दोन्ही वर्ग जरी श्रम करीत असले तरी त्यांच्या श्रमांमध्यें फार मोठा फरक आहे. मजूर कोणत्याही दर्ज्याचा असो-अगदीं सांगकाम्या दिसमजुरापासून एखाद्या मोठ्या कारखानदाराच्या पगारी मॅनेजरापर्यंत-परंतु या वर्गातले सर्व लोक कांहीं अटींवरठरलेल्या मोबदल्याप्रमाणें काम किंवा श्रम करतात. भग ही मजुरी दीवसाची ठरलेलीअसो, दर आठवड्याची ठरलेली असो, दर महिन्याची ठरलेली असो किंवा दर वर्षाची ठरलेली असो, म्हणजे मजूरी ही संपति उत्पन्न होण्याच्या आधीं ठरलेली रक्कम असते. संपत्युत्पादनाचे संबंधीं कांहींएक विशिष्ट ठराविक दृति त्यानें केली किंवा कांहीं एका ठराविक वळांत त्यानें कांहीं वस्तु तयार करून दिल्या म्हणजे मजुरावरची जबाबदारी संपते व त्याला कराराप्रमाणें पगार किंवा मजुरी मागण्याचा हक्क येतो. सारांश, मजूर व कारखानदार यांमध्यें चाकर व मालक या तऱ्हेचा भेद असतो. चाकरही श्रम करतो व श्रम करतो; म्हणून ते जसे एक कधींही समजले जाणार नाहींत, त्याचप्रमाणें मजूर व कारखानदार हे जरी श्रम करीत असले तरी ते एक मानले जाणार नाहींत. कारण नोकर किंवा चाकर मनिले यांचेवर करार पुरा करण्यापुरतीच मर्यादित जबाबदरी असते. परंतु मालकाची जबाबदारी अमर्याद असते. तोच प्रकार मजूर व कारखानदार यांमध्येंही असतो. मजूरावर संपत्त्युत्पाद्नाबद्यल मर्यादित अशी जबाबदारी असते. परंतु कारखानदाराची जबाबदारी अमर्यादित असते. त्याला संपत्ति उत्पन्न करण्याची सर्व जबाबदरी शिरावर घ्यावी लागते; त्याला संपत्तीचीं निरनिराळीं कारणें एकत्र कर-