या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१७३]

ण्याची काळजी असते; त्याला उत्पन्न केलेली सर्पाने विकण्याकरेतां गि-हाईक शोधून काढावयाचें असते. त्याच्या उत्पन्नामध्ये मजु प्रमाणें निश्चितपणा मुळींच नसतो. वरील विवेचनावरून कारखानदार व व्यापारी यांना संपतीचा मिळणारा वाटा कसा स्वतंत्र आहे है दिसून येईल.आतां या नफ्याच्या स्वरुपाचा विचार केला पाहिजे.
 नफा म्हणजे कारखानदार किंवा व्यापारी यांना आपला कारखाना किंवा व्यापार चालविण्याचा खटाटोपीचा मोबदला होय.
 हा नफा पुष्कळ घटकावयवांनीं झालेला असतो. प्रथमत: कारखानठ्ठाराच्या देखरेखीच्या श्रमाचा माबद्ला हा एक त्यांतला घटकावयव होय. दुसरा प्रत्येक व्यापारांत कांहीं एक धोका किंवा सट्टा याचा अंश असतो.व त्याबद्दलहि काही मोबदला कारखानदारास मिळाला पाहिजे.शिवाय कारखानदारांमध्ये कारखाना चालविण्यात कांही एक योजकता व घटनाशक्ती असावी लागते. त्याबद्दलही मोबदल्याचा अंश नफ्यांत असतो. मनुष्यामध्ये योजकता व घटनाशक्ती हे दोन गुण फार विरळा दृष्टीस पडतात व ते सर्व कारखानदारांमध्ये सारख्या प्रमाणाने असतात असाही नेम नाहीं. ते कमीअधिक प्रमाणानें असतात. ज्याप्रमाणें देशांतील जमीन कमी-अधिक सुपीक असते व त्यामुळे जमिनींच्या खंडांत कमीजास्तपणा असतो, त्याचप्रमाणें नफ्याचीही गोष्ट आहे, नफ्यामध्येहि कारखानदाराच्या योजकतेप्रमाणें व घटनाशकीप्रमाणें कमीअधिक नफ़ा होतो. दोघां माणसांनीं एका तऱ्हेचे कारखाने काढले; भांडवल, श्रम, कच्चा माल, यंत्रसामग्री वगैरे सर्व बाबतींत अगदीं साम्य असून एका मनुष्याचा कारखाना किफाइतशीर होतो तर एखाद्याचा आंतबत्त्याचा होतो. आंता हा फरक कारखानदाराच्या योजकता व इतर विशेष गुणांवर अवलंबून असतो व प्रत्येक धंद्यात कारखानदार अगदीं नादानापासून तें अत्यंत हुशारापर्यंत असतात व नादान कारखानदारांना नफा मूळींच मिळत नाहीं. चांगल्या कारखानदारांच्या योजकतेच्या मानानें कमीअधिक मिळतो. यावरून नफा हा खंडासारखा निरनिराळा असतो. त्याचा एकच दर कधीही असत नाहीं, म्हणजे नफ्याचें स्वरूप मजुरीसारखें नसतें. देशमध्यें सामान्य मजुरीचा दर एकच असतो. परंतु नफ्याचा सामान्य असा एक दर नसतो. तर जमिनीच्या खंडाप्रमाणें शून्यापासून हवा तितका वाढता असतो.