या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१७६]

जीं विशिष्ट कारणें सांगितली आहेत त्यांनीं जो काय नफ्यांत फरक राहील तेवढा मात्र कायम स्वरूपाचा असेल. उदाहरणार्थ, एखादा धंदा अगर व्यापार फार किळसवाणा अगर घाणेरडा अगर तिरस्छत असेल तर त्या धंद्याचा नफा इतर सुलभ व कमी मेहनतीच्या किंवा मानाच्या धंद्यांपेक्षां नेहमीच जास्त राहिला पाहिजे, हें उघड आहे; परंतु या विशिष्ट कारणाखेरीज बाकी सर्व नफ्याचा दर एकरूप होण्याकडे कल असलाा पाहिजे असा अभिमत अर्थशास्त्रकारांचा एक सिद्धांत आहे.
 परंतु या सिद्धांताचा खोटेपणा दाखवितांनाच नफा हा जमिनीच्या खंडासारखा आहे; म्हणजे त्याचा एकरूप होण्याकडे कल असण्याऐवजीं विविधतेकडे कल आहे असें अर्थशास्त्रज्ञांनीं दाखाविलें आहे; व हें अर्वाचीन अर्थशास्त्रकारांचें म्हणणें पुष्कळ अंशीं खरें आहे. कारण नफा हा कारखानदारांच्या योजकतेचा, कल्पकतेचा व वाटनाशक्तीचा परिणाम होय. कारण आपण असें पाहतों कीं, सारख्याच स्थितींतील दीन कारखाने किफाईतशीर किंवा आंतबट्याचे होतात व याचें कारणा कारखानदारांच्या कल्पकतेंतील फरक होय. तेव्हां सर्व धंद्यांतील व धंद्याच्या प्रत्येक प्रकारांतलि नफ्याचा दर एकल्प होत जाती हें म्हणणें वस्तुस्थितीस धरून नाहीं. उलट नफ्यामध्यें जमिनीच्या खंडाप्रमाणें एकप्रकारची विविधताच येत असते व याचा प्रत्यक्ष अनुभव संयुत्कभांडवलानें काढलेल्या कंपन्यांच्या नफ्यातोट्यांच्या हिंशोबाबरून खासा येतो. या हिशेबांत अांतबट्ट्याचा व्यापार करणाच्या कंपन्यांपासून तों थेट शेंकडा वीस पंंचवीस किंवा तीस नफा मिळवणाऱ्या कंपन्या दृष्टीस पडतात. याचरून नफ्याच्या दुराचा विविधतेकडेच कुल आहे असें म्हणणें भाग आहे.
 नफ्यााच्या एकीभावांपेक्षा विविधतेकडे कल आहे याला दुसरेंही एक प्रमाण आहे. तेंं हें कीं, संपत्तीच्या इतर सर्व वांट्यांपेक्षां नफ्याचें स्वरूप निराळें आहे. जमिनीचा खंड, मजुरी किवा व्याज या सर्व वांत्यांमध्येंं एकप्रकारचा निश्चितपणा आहे. कारण यांतील पहिले दोन भाग करारावरच बहुशा अवलंवून असतात व तिसराही देशांतील भांडवलाची विपुलता अगर दुर्मिळता यावर अवलंबून असतो. परंतु हे सर्व वांटे कारखानदाराला माल त्यार होण्याच्या आधीच किंवा त्या समयींच द्यावे लागता व प्रत्येक वेळींं त्याची रक्कम ठरलेलीच असते. परंतु नफा हा