या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१७७]

कधींही करारानें ठरलेला वांटा नसतो. तो कारखानदाराला संपत्तीची विल्हेवाट लावल्यावर मिळावयाचा असतो व त्यांत एक प्रकारचा सट्टयाचा अंश असतो. माल तयार करतांना पुष्कळ वेळ जातो व या अवधींत मालाच्या किंमतींत फरक होण्याचा संभव असतो. जर कारखानदाराच्या सुदैैवानें त्यानें अटकळ केलेल्या किंमतीपेक्षां मालाची किंमत वाढली तर त्याला अनपेक्षित नफा होईल. परंतु दुर्दैवानें किंमत कमी झाल्यास नफ्याच्या ऐवजीं व्यापारांत व धंद्यांत त्याला ठोकर लागण्याचाही संभव असतो. याप्रमाणें नफ्यामध्यें एक प्रकारचा अनिश्चितपणा हा स्वभावसिद्ध असतो व म्हणून सर्वांना सर्व वेळीं व सर्व ठिकाणीं सारखा नफा मिळणें अशक्य असतें. उलट नफ्याची बाब ही सट्टयासारखी असते. कांहीं व्यापार तर निवळ जुगारीच्या खेळासारखे असतात. हल्लींच्या काळीं सर्वजग म्हणजे एकच व्यापारी पेठ झाल्यासारखी झाली आह व यामुळे या व्यापारी पेठेचे जे जिन्नस-उदाहरणार्थ, कापूस, गहूं, कोळसा, राकेल, सोनें, रुपें वगैरे जिनसांचा घाऊक व्यापार म्हणजे एकप्रकारचा जुगारच झाला आहे. यामुळे जुगारीप्रमाणेंच याही व्यापारांत क्षणांत मनुष्य लक्षापति किंवा भिक्षापति होऊं शकतो. यावरून नफ्याचा विविधतेकडेच कल आहे असें म्हणणे प्राप्त आहे.
 येथपर्यंत औद्योगिक बाबतीत प्रगतीस गेलेल्या समाजामध्ये संपत्तीचे मुख्य वांटे कसे व कोणते होतात हें दाखविलें. संपत्ति मुख्यतः चार वर्गांच्या संगनमतानें उत्पन्न होते. तेव्हां उत्पन्न झालेल्या संपत्तीचे जे चार मुख्य वांटेकरी आहेत ते जमीनदार, मजूर, भांडवलवाले कारखानदार व व्यापारी हे होत. समाजांतील इतर सर्व वगचेिं उत्पन्न या चार मुख्य वांट्यांच्या पोटांतून होतें. सर्व व्यवहार चढाओढीनें चालले आहेत, समाजांतील सर्व वर्ग सारखे शिकलेले असून प्रत्येक मनुष्याला आपलें हित कळत आहे, तसेच समाजामध्यें संपत्तीची वांटणी ही रूढीने न ठरतां फक्त करारानेंच ठरते, वगैरे गोष्टी गृहीत धरून समाजामध्यें संपत्तीचें वांटे कसे व कोणते पडतात, हें आपण आतांपर्यंत पाहिलें. परंतु या गृहीत गोष्टी सर्व ठिकाणी व सर्व धंद्यास लागू असतांत असें नहीं. कमी अधिक प्रमाणाने सर्व ठिकाणी रुढीचा अंमल चालूच असतो. शिवाय शेतकीच्या बाबतींत लागवडीच्या निरनिराळ्या पद्धती निरनिराळ्या ठिकाणीं अस्तित्वांत असतात व या निर