या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१९५] यावरून इंग्लंडमध्येही ही पद्धति फायदेशीर आहे यांत शंका नाही, व सरकारनें जर ही सुधारणा घडवून आणण्याचे मनावर घेतले तर त्यांत यश येण्याचा जास्त संभव आहे असा पुष्कळांचा समज आहे परंतु छोट्या शेतीपासून असा फायदा होण्याची मुख्य अट अशी आहे कीं, शेतकऱ्यास स्वामित्वाची व मालकीची जाणीव पाहिजे. म्हणजे तो शेतकरी शेताचा मिराशी अधून जमिनीवरील कर किंवा सारा हा कायमच्या स्वरूपाचा पाहिजे. तर त्याला आपल्या जमिनीची इतक्या काळजीनें मशागत करण्याची बुद्धि होईल. आपण केलेल्या जमिनीच्या सुधारणेवर दुसऱ्याचा हक्क उत्पन्न होणार अशी धास्ती शेतकऱ्यास असली म्हणजे त्याच्याकडून शेताची मशागत होणे शक्य नाहीं; व कायमचा सारा नसला म्हणजे अशी धास्ती शेतकऱ्याच्या मनांत राहणारच. मग असा शेतकरी उपरि कुळासारखाच होतो व त्याला जामिनीबद्दल आपलेपणा वाटत नाहीसा होतो.

                  भाग दहावा.
           हिंदुस्थानांतील जामिनधाऱ्याच्या पद्धति.

मागील तीन भागांत युरोपामध्ये पूर्वकाळी अस्तित्वात असलेल्या व प्रचलित असलेल्या जामिनधाऱ्याच्या पद्धतीचे वर्णन देऊन अर्थशास्त्र दृष्टया व सामाजिक दृष्टया सर्वांत चांगली जमीनधाऱ्याची पद्धति कोणती या प्रश्नाचा विचार केला. आतां या भागांत हिंदुस्थानामध्यें प्रचलित अस लेल्या जमीनधाऱ्याच्या पद्धतीचा विचार करावयाचा आहे. परंतु युरो पातील व हिंदुस्थानांतील जमीनधाऱ्याच्या पद्धतीमध्ये एक मोठा भेद आहे; तो हा की, युरोपमध्ये जमीन ही खासगी व्यक्तीच्या मालकीची सम- जली जाते तर हिंदुस्थानांत सर्व जमीन सरकारची आहे असे समजले जाते युरोपमध्ये ज्यावेळीं जहागिरी-पद्धति सुरू होती त्यावेळी राजा किंवा देशा तील सरकार हे जमिनीचे मालक अशी समजूत होती खरी. तरी कालेंकरून