या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २०१ ]

बारी पद्धतीमध्यें कायम सा-याची पद्धति सुरू ठेवण्याचा विचार होता. परंतु बंगालच्या कायम सा-याच्या पद्धतीनंतर लवकरच इंग्लंडांतील मतामध्यें फरक होत चालला व रिकार्डोच्या खंडाच्या उपपत्तीमधील ' अनुपार्जितवाढी'ची कल्पना प्रचलित झाली. कांहीं अंशीं या कल्पनेच्या प्रसारामुळें व कांहीं अंशीं कंपनी सरकारच्या डायरेक्टरांच्या स्वार्थी दृष्टीमुळें सरकारचें आपोआप वाढतें उत्पन्न घालविणें बरोबर नाहीं असें मत होऊन कायम सा-याची पद्धति पुढल्या कोणत्याही प्रांतास सररहा लाविली गेली नाहीं. यामुळें कायम साऱ्याच्या पहिल्या प्रकाराचें उदाहरण फक्त बंगाल प्रांताचेंच आहे. मद्रासेस `पाळेगारी ' या नांवानें ही पद्धति थोडीशी चालू आहे. तसेंच मुंबई इलाख्यांत कांहीं मोठमोठे इमानदार आहेत त्यांनाही कायम सा-याच्या सनदा दिलेल्या आहेत. सारांश, बंगालखरेजि इतर सर्व प्रांतांत जमीनदारी पद्धति ह्मणण्या इतकी मोठ्या प्रमाणावर कोठेंच प्रचलित नाहीं. कांहीं विशेष कारणाकरितां सरकारनें कांहीं व्यक्तींना कायम सा-याच्या सनदा दिल्या आहेत ख-या व म्हणून तुरळक तुरळक जमीनदारी सर्वत्र आहे असें म्हणतां येईल. परंतु ही गोष्ट अपवादादाखल आहे. पटवारी पद्धति मध्यप्रांतांत कांहीं ठिकाणीं व संयुक्त प्रांतांत कांहीं ठिकाणीं आहे; परंतु त्यांपैकी कायम साऱ्याच्या पद्धति फारच क्कचित् आहे. तसेंच कायम सा-याची रयतवारी हीही फार थोड्या प्रमाणावर कोठें कोठेंं आहे. येथेंही विशेष कारणाकरितां कांहीं व्यक्तींना सरकारनें कायम सा-याच्या सनदा दिल्या आहेत. आमच्या प्रांतांत अशा जमिनींना इनामी जमिनी म्हणतात.या जमिनीवर सरकार अगदीं माफक असा कायमचा सारा घेतें, त्याला कोठं अष्टमांश पटी अगर इनामी पटी असें म्हणतात. परंतु या पद्धतीचीं उदाहरणेंही तुरळकच आहेत. तेव्हां कायम सा-याच्या पद्धतीच्या तीन पोटभेदांपैकी एक पोटभेदच फार मोठा व फार महत्वाचा आहे. बाकीचे पोटभेद यांचीं उदाहरणें तुरळक आहेत. परंतु शास्त्रीय वर्गीकरणाच्या पूर्णतेकरितां तीन पोटभेद पाडणें अवश्यक होतें ह्मणून असे तीन भेद केले आहेत.
हिंदुस्थानांतील सध्या प्रचलित असलेल्या जमिनसाऱ्याच्या बहुतेक पद्धति मुदतीच्या साऱ्याच्या वर्गाच्या तीन पोटभेदांमध्यें येतात.