हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२०६]

प्रयत्न होऊं लागला व युरोपच्या सुदैवानें किती तरी नवीं नवीं यंत्र निर्माण होऊं लागली. वेंटनें वाफेच्या शक्तीचा शोध लावला व त्या शुक्तीनें चालणारीं एंजिनें निर्माण केलीं. या शोधापासून उद्योगधंयांत एक प्रचंड क्रांति घडून आली व त्याचेयोगानें पूर्वींच्या उद्योगधंद्यांचें स्वरूप पार पालटून गेलें. आतां धंदे घरगुती स्वरूपाचे राहिले नाहींत. त्यांना कारखान्यांचें किंवा गिरण्यांचें विराट स्वरूप प्राप्त होत चाललें. कारण या वाफेच्या एंजिनांच्या योगानें व दुसऱ्या यंत्रांच्यायोगानें श्रमविभागाचें तत्व अंमलांत येऊं लागलें व त्यामुळें संपत्तीच्या वाढीला विलक्षण वेग येत चालला. हातमागावर कापडाला चार किंवा पांच दिवस तयार होण्यास लागत तें कापड एका अर्ध्या तासांत अगर पंधरा मिनिटांत होऊं लागलें. ही जी संपत्तीची विलक्षण वाढ होऊं लागली, तिच्यामुळें कारखानदारांचें निवळ घरगुती गिऱ्हाइकांवर भागेना; त्यांच्या कारखान्यांच्या प्रचंड पैदाशीस परदेशी गिऱ्हाईक पहावें लागूं लामलें. परंतु विराट स्वरूपी गिरण्या व कारखाने सुरु करण्याकरितां हजारों रुपयांचें भांडवल लागूं लागलें व हे प्रचंड कारखाने चालविणारे स्वतंत्र कारखानदार निर्माण झाले; व पूर्वींच्या घरगुती काळांतील बहुतेक सर्व कामगार यांचे स्वतंत्र धंदे जाऊन त्यांना या प्रचंड कारखानदारांकडे सांगकामी मजुरी करण्याचें भाग पडूं लागलें. पूर्वींच्या काळचा केोर्ट, पूर्वींच्या काळचा कातारी, पूर्वींच्या काळचा रंगारी वगैरे सर्व कामगार लोकांचा घरगुती धंदा नाहीसा झाला व त्यांना कापडाच्या गिरणींत, लोखंडाच्या कारखान्यांत किंवा धातूच्या गिरणींत किंवा रंगाच्या गिरणींत मजुरदार बनल्याखेरीज गत्यंतर नाहींसें झालें. युरोपांतील उद्योगधंद्यांच्या या काळाला औद्योगिकक्रांतीचा काळ म्हणतात हें आतां वर सांगितलेंच आहे; व या काळांत पूर्वींच्या काळच्या हजारों कामकरी वर्गाचें कौशल्य नवीन यंत्रांनीं कुचकामाचें करून टाकलें व त्यांचा सामाजिक दर्जा कमी झाला व ज्यांच्याजवळ पुष्कळ पैसा त्यांना महत्त्व आलें. कारण पैशानें यंत्रे घेऊन कारखाने काढणें शक्य झालें. निदान कारखानें काढण्याचें ज्ञान असणाऱ्या माणसांची पैशाकरितां मागणी वाढली व ज्यांच्या जवळ पैसा आहे त्यांचें उत्पन्न वाढलें. पण ज्यांच्याजवळ नुसतें हस्तकौशल्य आहे त्यांना कांहींच महत्व राहिलें नाहीं. कारण पैशाचें यंत्र करणें सोपें होतें; परंतु कौशल्याचें