हे पान प्रमाणित केलेले आहे.
[१०]

पेक्षां दुसरा एक सुलभ उपाय त्यांनीं शोधून काढला. तो उपाय म्हणजे देशांतल्या आयातनिर्गत व्यापारावर नजर ठेवून देशांत पैसा जास्त येईल असें करणें हा होय. देशाबाहेर जो माल जातो त्याबद्दल देशांतील व्यापा-यांना पैसे मिळतात, व देशांत जो माल येतो त्याबद्दल पैसे देशाबाहेर जातात. तेव्हां निर्गत मालाची किंमत आयात मालापेक्षां नेहमीं जास्त असली म्हणजे या दोहोंमधला फरक देशामध्यें पैशाच्या रूपाने आला पाहिजे. यालाच उदीमपंथी लोक व्यापाराचें समतोलन म्हणतात. व प्रत्येक देशानें हें समतोलन आपल्याला अनुकूल करून घेण्याचें धोरण ठेविलें पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता व हें समतोलन आपल्याला अनुकूल करून घेण्याकरितां उदीमपंथी मुत्सद्द्यांनी व राष्ट्रांनीं सहा उपायांची योजना केली होती. निर्गत व्यापार वाढविण्याकरितां योजावयाचे उपाय म्हणजे:-
 १ बाहेर देशीं माल पाठविणारास दरशेकडा काही प्रमाणानें बक्षीस देणें,
 २ त्यांना जकातीची सूट किंवा सवलत देणें,
 ३ दुस-या देशांशीं आपला माल सवलतीनें खपण्याकरितां फायदेशीर तह करवून घेणें,
 ४ आपल्या ताब्यांतल्या वसाहती स्थापून त्यांच्याकडील सर्व व्यापार अापल्या ताब्यांत ठेवणें,
 ५ आयात मालाचा व्यापार कमी करण्याकरितां जबर जकाती ठेवणे.
 ६ व कायद्यांनी मालाची आयात अजीबाद बंद करणें.
 या शटसाधनांनी आपल्या देशाचा निर्गत व्यापार अतोनात वाढेल व व्यापाराचें समतोलन आपल्याला अत्यंत अनुकूल झाल्यानें देशांत मुबलक पैसा व सोनेंनाणें खेळतें राहील असा उदीमपंथी लोकांचा दृढ समज होता
.   अॅडम स्मिथनें आपल्या पुस्तकामध्ये उदीमपंथाच्या तत्वांची व मतांची ही हकी}कत दिली आहे. अॅडम स्मिथच्या काळीं उदीमपंथाच्या स्थापनेला शें दोनशें वर्षें होऊन गेलीं होती व त्याच्या धोरणाचा कांहींसा अतिरेक झाला होता. कारण या पंथाचा राज्यकर्त्यांच्या व मुत्सद्द्यांच्या मनावर पूर्ण पगडा बसून त्यासंबंधीं अतोनात कायदे होऊन हजारों