हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२१०]

हित कळतें व उद्योगधंद्यांत सरकारनें मुळींच हात घालूं नये हे अँँडाम स्मिथचें म्हणणें लोकांना वेद्तुल्य वाटूं लागलें होतें ,यामुळें कायद्यानें सुधारणा घडवून आणण्यांत लोकग्रहाचाच मोठा अडथळा होता. परंतु हा अडथळा लवकरच नाहींसा होऊन कारखान्याबद्दलचे कायदे इंग्लंडमध्यें एकामागून एक पसार होत गेले. या कायद्यांचा उद्देश अप्रत्यक्ष रीतीनें मजुरांची स्थिति सुधारण्याचा होता. म्हणजे जुन्या घरगुती स्थितींंतील धंद्यांत जे सामान्य नियम धंद्यांतील लोकांनींं किंवा समाजानें केलेले असत, तशा तऱ्हेची कांहीं तरी नियमवद्धता कायद्यानें उत्पन्न केली.
 कारखान्यांतील कामाचे तास कायद्यानें ठरविले; तसेंच कोणत्या वयाच्या आंत कारखान्यांत मुलें घेऊं नयेत त्याबद्दल निर्बंध केले गेले. बायकांना किती तास काम द्यावें याबद्दल कायदे झाले. कारखानदारानें मजुरांना वर्षांतून कांही नियमित सुट्या दिल्या पाहिजेत, आठवड्यांतून एक दीड दिवस सुट्टी दिली पाहिजे, वगैरे प्रकारचे कायदे सर्वत्र करण्यांत आले. तसेंच कारखानदारानें आपल्या इमारती आरोग्याच्या नियमांकडे लक्ष देऊन बांधल्या पाहिजेत: हवा व उजेड चांगला येईल अशा तऱ्हेच्या गिरण्या व कारखाने पाहिजेत,कारखानदारानें मजूरांकरितां चांगली हवाशीर घरें बांधून दिलीं पाहिजेत; अशा प्रकारचेही निर्बंध कांहीं ठिकाणीं केले गेले: तसेंच गिरणींत काम करणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची सोय कारखानदारानें केली पाहिजे असाही निर्बंंध कोठें कोठं केला गेला. सारांश, मजुरांच्या आरोग्याकडे लक्ष देणें हे सरकारचें काम आहे व इतकी तजवीज सरकारनें कारखानदारांस करावयास लावण्यास हरकत नाहीं असें हल्लीं सर्व सुधारलेल्या सरकारचें मत आहे. ज्याप्रमाणें जनावरांना क्रूरपणानें वागविणें हें वाईट अप्रून तें कायद्यानें बंद करणें हे सुधारलेल्या सरकारचें कर्तव्यकर्म समजलें जातें, ज्याप्रमाणें लोकांच्या नीतीचें रक्षण करणें हें हल्लीं सरकारचें कर्तव्यकर्म समजलें जातें, त्याचप्रमाणें लोकांच्या आरोग्याकडे लक्ष देण सरकारचें कर्तव्यकर्म आहे असें लोकमत झाललें आहे, या तत्वावरच सर्व कारखान्यांचे कायदे करण्यांत आलेले आहेत व या कायद्यांचा पुष्कळ इष्ट परिणामही झालेला आहे.
 परंतु मजूरवर्गाची स्थिति सुधारण्याचा एक मोठा जबरदस्त उपाय सरकारनें हातीं घेतला तो सक्तीचा व फुकट शिक्षणाचा होय. प्रचंड