हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ २२० ]

कांच्या रिपोर्टाप्रमाणें पुढे १८७१|७२ मध्यें मजुरांच्या संघाचे कायदे झाले. तेव्हांपासून या संस्थांना कायदेशीर स्वरूप येऊन त्यांना बंधुसमाजाच्या कायद्यांचा फायदा मिळू लागला व या पुढील काळानंतर संघांची संख्या अतोनात वाढली. बहुतेक प्रत्येक धंद्यांतील मजुरांचे संघ बनले व मोठमोठ्या कारखान्यांतील नोकरांचे संघ होऊं लागले व निवळ सांगकाम करणाऱ्या मजुरी करणाऱ्या मजुरांनी सुद्धा आपले संघ केले. सारांश, देशांतील सर्व मजूरवर्गामध्यें आपलीं स्थितेिं सुधारण्याची जाणीव उत्पन्न होऊन जो तो मजूरवर्ग त्यासंबंधीं संघटित प्रयत्न करूं लागला. व हल्ली या मजुरांच्या संघाचें महत्व व प्रस्थ इंग्लंडांत फारच आहे. या संघांनीं आपल्या बाजूचे प्रतिनिधी पार्लमेंटांत पाठविण्याची सुरुवात केली आहे व गेल्या दोन पालमेंटांपासून मजुरांचा एक स्वतंत्र पक्ष इंग्लंडांत झाला आहे व त्याचें वजन दिवसेंदिवस वाढत आहे हें इंग्लंडाच्या अर्वाचीन इतिहासाची माहिती असणारांस नव्यानें सांगण्याची जरूरी नाहीं.
 या मजुरांच्या संघाचा दुहेरी हेतु असतो. पहिला हेतु आपल्या हिताचें रक्षण करणें हा. यांत मुख्यतः दोन गोष्टींचा समावेश होतो. कारखानदारांकडून वाटाघाटीनें आपली मजुरी वाढवून घेणें निदान ती कमी होऊ न देणे. दुसरी किमानपक्षमजुरी ठरविणें व कामाचे तास कमी करून घेणें. हा या संघाचा मुख्य हेतू झाला. परंतु या हेतूबरोबरच दुसराही एक गौण हेतू सर्व संघांच्या कार्यक्रमांत येतो. तो हेतू म्हणजे या संघापासून बंधुसमजासारखे फायदे करून घेणें. उदाहरणार्थ, और्ध्वदेहिकासंबंधींच्या खर्चास मदत देणें, आजारांत किंवा अपघातांत मदत देणें, काम न लागतां आळसांत रहावें लागल्यास त्या वेळीं मदत देणें, वायातीतपणामुळें काम होईनासें झालें म्हणजे मदत देणें वगैरे प्रकारचे पुष्कळ लाभया संघाच्या हेतूमध्यें नमूद केलेले असतात. व या संस्था या प्रत्येक हेतूच्या सिध्यर्थ सभासदांकडून निरनिराळी वर्गणी घेतात व या सर्व प्रसंगी सभासदांना मदत करितात.
 या संघाची रचना व व्यवस्था प्रतिनिधींच्या संस्थांच्या नेहमींच्या रचनेप्रमाणे व गाणे व व्यवस्थेप्रमाणें असते. म्हणजे सर्व सभासदांचा मिळून एक संघ अगर सभा होते. त्यांतून चिटणीस, अध्यक्ष, उपाध्यक्ष, ट्रेझरर निवडतात व शिवाय संघाची एक व्यवस्थापक कमिटीही असते.