हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२२७]

असतां त्यानें मजुरांच्या सांपत्तिक स्थितीलाही धोका पोंचला पाहिजे हैं उघड आहे. परंतु यांतील पुष्कळ नियम हे अज्ञानाचे परिणाम आहेत. मजुरांचें यथार्थ ज्ञान वाढलें ह्मणजे हैं नियम कादून टाकण्याची त्यांना बुद्धिही होईल. उदाहरणार्थ, एखाद्या धंद्यांत किती मजूर उमेदवार ह्मणून घ्यावे यासंबंधीं कडक नियम कांहीं मजूरसंघांनी केलेले आहेत. अशा त-हेच्या धोरणानें केव्हां केव्हां धंद्याच्या वाढीस अडथळा होईल हें खरें आहे. तसेंच नवीन यंत्राची कारखान्यांत योजना करण्यासंबंधींही कांहीं कांहीं संघ फार विरोध करतात हीही गोष्ट एकंदर धंद्याच्या प्रगतीस अडथळा करणारीच आहे. परंतु अशा प्रकारच्या गोष्टी थोड्या आहेत व मजुरांमध्यें धंद्यासंबंधीं व अर्थशास्त्राच्या नियमांसंबंधीं खरें ज्ञान जसजसें वाढेल तसतसे अज्ञानमूलक उपाय हे संघ स्वीकारणार नाहींत यांत शंका नाहीं.

भाग चवदावा.
सहकारिता.

 संघाच्या कल्पनेप्रमाणें सहकारितेची कल्पना प्रथमतः इंग्लंडांतच निघाली. ज्या तत्वानें सर्व सुधारलेल्या राष्ट्रांमध्यें मोठी सुधारणा घडवून आणिली व ज्याची छाप पुष्कळ औद्योगिक चळवळींत दिसून येते त्या तत्वचा उगम एका लहानशा शहरांत झाला व तो अगदीं आकस्मिक कारणांनीं झाला हें पाहिलें ह्मणजे त्याबद्दल मोठं आश्चर्य वाटतें. १८४० च्या सुमारास रॉचडेल हें शहर एक साधारण प्रतीचें होतें व तेथल्या फलाणीच्या कारखान्यांतील विणकरांची व्यापाराच्या मंदीनें फार हलाकी झाली होती व त्यांची मजुरी त्यांना जेमतेम पुरत असे नसे. अशा संकटसमयीं कांहीं विणकरांच्या मनांत अशी कल्पना आली कीं, किराणा जिनसाचे व्यापारी आपल्यापासून फार किंमत घेऊन मालही वाईट व घाणेरडा देतात त्या अर्थी आपला एक किराणा जिनसाचा डेपो काढावा ह्मणजे आपल्याला माल चांगला मिळून किंमत बेतानें पडेल. हा विचार