हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ २२८]

पसंत झाला व २८ विणकरांनीं २८ पेोंड भांडवल जमविलें. हें भांडवल एकदम त्यांना उभारतां आलें नाही. परंतु प्रत्येक माणसाचा १ पौंडाचा भाग असें ठरलें व या माणसांनीं आपला रॉचडेल पायोनिअर्स म्हणून एक सहकारी डेपो काढला व प्रथमतः घाऊक व्यापायांकडून चहा व साखर हीं रोखीनें खरेदी करून आणली. व आपल्या सभासदांना नेहमीच्या बाजारभावानें विकत दिली. या डेपोचें मुख्य तत्व हृणजे रोखीचा व्यवहार करणं हें होय. यायोगानें त्यांना माल उत्तम मिळून तो पूर्वीच्या दरानें मिळूं लागला. वर्षाच्या शेवटीं या डेपोला फारच फायदा झाला. तेव्हां विणक-यांना लागणारा दुसरा मालही डेपोंत ठेवण्यांत येऊं लागला. याप्रमाणें या लहान संस्थेपासून मजुरांना फार फायदा होऊं लागला. ही बातमी जिकडे तिकडे पसरली व ही २८ विणक-यांनीं काढलेली लहानशा सहकारी तत्वावरील संस्था कालेंकरून एक स्वतंत्र संस्थानाप्रमाणें अवाढव्य व प्रचंड संस्था झाली व तिच्या पुष्कळ ठिकाणीं शाखा निघू लागल्या. या संस्थेमधील नफा गिऱ्हाइकांना त्यांच्या विक्रीच्या मानान दिला जात असे. बहुधा गि-हाइकें आपला नफा घेऊन जात नसत. तर ' तो डेपोमध्यें भांडवल ह्मणून घालीत. यामुळे सहकारी संस्थांचें भांडवल भराभर वाढू लागले. तेव्हां या डेपोच्या उत्पादकांनीं घाऊक विक्रीचें दुकान सहकारी तत्वावर काढलें. हीं दोन दुकानें चालवून आणखी भांडवल शिल्लक राहू लागलें; तेव्हां त्यांनीं उत्पादक धंद्याकडे आपलें लक्ष घातले; व प्रथमतः पिठाच्या गिरण्या काढून मग रोटी करण्याचे कारखाने काढले.याप्रमाणे त्यांचा प्रपंच सारखा वाढत चालला. पुढें निरनिराळ्या ठिकाणं शाखा सुरू केल्या; कापडाच्या गिरण्या सुरू केल्या; मालाची नेआण करण्याकरिता आपल्या मालकीच्या आगबोटी ठेविल्या; सारांश, डोंगराच्या पायथ्याशी केंसासारख्या झुळझुळ वाहणाऱ्या लहानशा झऱ्याची पुढें मोठी नावा चालण्यासारखी प्रचंड नदी होते त्याचप्रमाणे या संस्थेच्या क्षुल्लक उगमापासून तिची प्रचंड वाढ होत गेली . परंतु आश्रयकारक यशाचें मूळबीज तिच्या रोखीच्या तत्वांत आहे असें दिसून आल्यावांचून राहणार नाही. आधीं रोखीच्या व्यवहारात बुड व कर्ज नसल्यामुळे व्यापारांत खोट येण्याचा संभवच नाही .दुसरें रोखीच्या पद्धतीनें थोड्या भांडवलावर फारच मोठा व्यापार करता येतो.