हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२३३]

अशीच स्थिती झाली आहे व त्यामुळें स्वावलंबनाचे किती तरी मार्ग त्यांनी शोधून काढले आहेत.
 मागच्या व या भागांत मिळून आतांपर्यंत ज्या दोन प्रयत्नांचें वर्णन केलें ते प्रयत्न म्हणजे मजुरांचे संघ व सहकारी संस्था या होत. या दोन्ही संस्थांचें पर्यवसान मजुरांच्या उत्पन्नांत वाढ करण्यांत होतें हें उघड आहे. परंतु याशिवाय दुस-या दोन प्रकारच्या संस्था युरोपांत व इंग्लंडांत पसरलेल्या आहेत; त्यांचा उद्देश मजुरांच्या उत्पन्नाची वाढ करण्याऐवजीं त्यांच्या उत्पन्नांतून काटकसरीनें शिल्लक ठेवून मजुरांची सांपत्तिक स्थिति सुधारण्याचा असतो. यांपैकीं पहिल्या प्रकारच्या संस्था ह्मणजे घर बांधण्याला मदत करणा-या संस्था होत. या मंडळ्या मजुरांना घरें बांधण्याकरितां हलक्या व्याजानें कर्जाऊ पैसे देतात व हे पैसे हळू हळू हप्त्याहप्त्यानें फेडून घेतात. या मंडळ्यांचेयोगानें मजुरांमध्यें काटकसर या गुणाला उत्तेजन मिळून पुष्कळ मजुरांना स्वतःच्या सोयीचीं हवाशीर घरें मिळालीं आहेत. या पद्धतीचाही प्रसार इंग्लंडमध्यें पुष्कळच झालेला आहे.
 अशा प्रकारच्या शेवटच्या संस्था म्हणजे विमा उतरणा-या संस्था, मजुरांना अडचणीच्या प्रसंगीं पैशाची मदत करणा-या संस्था व त्यांची शिल्लक ठेवीनें ठेवणा-या संस्था व एकंदरींत परस्परांना हरएक प्रकारची मदत करणा-या 'बंधुसमाज' नांवाच्या संस्था होत. यांच्यायोगानेंही मजूरवर्गाचें पुष्कळ हित झालेलें आहे; परंतु आतांपर्यंतच्या संस्थांच्या सविस्तर वर्णनानंतर या संस्थांचें आणखी विशेष वर्णन करण्याची जरूरी नाहीं. कारण तें चर्वितचर्वणाच्या जातीचें होईल तेव्हां हा भाग येथेंच संपविणें बरें.
 या दोन्ही भागांत वर्णन केलेल्या संस्था हिंदुस्थानांत अझून नाहींतच असें ह्मटलें तरी चालेल. या अभावाचीं दोन कारणें आहेत. प्रथमतः ज्या औद्योगिक परिस्थितीत अशा संस्था निघतात अशी परिस्थिति अद्याप हिंदुस्थानांत उत्पन्न झाली नाहीं. मागे एकदां सांगितलेंच आहे की, हिंदुस्थान हा अद्यापपावेतों प्रायः कृषिवृत्ति देश आहे. तो उद्योगवृत्ति होऊं लागला आहे हें खरें. परंतु अझून सगळे धंदे प्रायः बरगुती स्थितींत आहेत. प्रचंड कारखान्याची पद्धत येथें अद्याप अपवादादाखल आहे. व ह्मणून गिरण्यांतील किंवा कारखान्यांतील मोठा मजूरवर्ग तयार झालेला नाहीं. कांहीं कांहीं शहरांत असा स्वतंत्र वर्ग होऊं पहात आहे. दुसरें कारण, या मजूर-