या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोग्य वस्तू व जंगम मिळकती यासंबंधींच फक्त खासगी मालमत्तेची संस्था असावी. परंतु उत्पत्तीचीं साधनें खासगी व्यक्तींच्या मालकीचीं नसावीं असें या पथाचें म्हणणें आहे.

     चवथा पंथ म्हणजे संयुक्त सामाजिक पंथ होय. या पंथाला खासगी मालकीची संस्था हीच मुळीं सर्व अनर्थाचें मूळ भासतें. कारण या रंबांसगी मालकीच्या संस्थेपासूनच समाजांत सर्व विषमता उत्पन्न झाली आहे, असें हा पंथ म्हणतो. तेव्हां या पंथाला सर्व संपत्ति सर्व लोकांची संयुक्त व्हावी अशी इच्छा आहे. ज्याप्रमाणें कुटुंबामध्यें सर्व  गोष्टी संयुक्त मालकीच्या असतात; कुटुंबांतील निरनिराळ्या व्यक्तींची खासगी मालमत्ता नसते; कुटुंबांतील सर्व व्यक्ति आपआपलें उत्पन्न एकत्र करतात व त्याचा उपभोग सर्व सारख्याच तऱ्हेनें घेतात; सारांश, कुटुबांत ज्याप्रमाणें सर्व व्यक्ति अगदीं एकरूप असतात व तेथें विषमता किंवा संपत्तीची वांटणी यांचा प्रश्नच उद्भवत नाहीं; त्याप्रमाणें सर्व समाजाची संपात्ति संयुक्त असली म्हणजे हल्लीचे सर्व अनर्थ व विषमता नाहींशी हेईल. तेव्हां अशी संयुक्त संपत्तीची स्थिति समाजांत घडवून आणण्याचा उद्देश या पंथानें आपल्या डोळ्यांपुढें ठेविला आहे.
         या सर्व पंथाचा एकत्र विचार केला असतां सामाजिक पंथांची एकापुढें एक अशी मालिकाच बनते. व्यक्तिक सामाजिक पंथ हा समाजांतील मजूरवर्गाची दैन्यावस्था. आपखुषीच्या मार्गानें व व्याकतीच्या खटपटीनें सुधारण्याचा प्रयत्न करतो या अर्थानें मागील देन भागांत वर्णिलेल्या मजुरांचे संघ सहकारी संस्था; सहकारी पतपेढ्या वगैरेंसारख्या मजूरवर्गांची स्थिति सुधारणा-या सर्व प्रकारांचा अन्तर्भाव व्यात्तिक सामाजिक पंथांत हेऊं शकेल. परंतु स्वावलंबनावर उभारलेल्या या संस्थांचा बहुधा सामाजिक पंथाच्या उपायांत अन्तर्भाव केला जात नाही. राष्ट्रीय सामाजिक पंथ एक पाऊल पुढें जातो. समाजांतील गरीब लोकांची स्थिति सुधारण्याचे सरकारी. काययानें घडवून आणलेले सर्व प्रयत्न या सदरांत येतात. या दृष्टीनें कारखान्याचे कायदे, सक्तीचें शिक्षण इत्यादि उपाय सामाजिक पंथीच होतात व ह्ल्लींच्या काळीं या पंथाची छाप सुधारलेल्या सरकारावर आहे यांत शंका नाहीं, या दृष्टीनें व्यक्तिस्वातंत्र्याचें माहेरघर इंग्लंड देश त्यामध्येंही