या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 [ ૨૪૮ ] सामाजिक पंथाचें वजन पडलें आहे असें म्हणण्यास हरकत नाही. सामाजिक पंथाच्या सर्व पंथांत हाच खरोखरी सुसाध्य पंथ आहे हें पुढील विवेचनावरुन दिसून येईल.

सामाजिक पंथाचा तिसरा प्रकार समाईक. याची मजल राष्ट्रीय सामाजिक पंथाच्याही पुढें आहे. या पंथाला सर्व उत्पत्तीचीं साधनें सरकारी मालकीचीं असून सर्व लोकांची संपत्तीची वांटणी कायद्यानें समतेच्या तत्वावर ठरलेली असावी असें वाटतें. या पंथाप्रमाणें सरकारनें धंद्याचा सर्व पुढाकार आपल्या हाती घ्यावा व सर्व व्यवस्था त्यानें करावी असा आहे. या पंथाचा लोकांची स्थिति सुधारण्याचा एक मुख्य उपाय म्हणजे देशांतील जमीन सरकारी मालकीची करण्याची कल्पना होय. या उपायुच्या युक्ताययुक्तेचा पुढील भागांत विचार करावयाचा आहे.' तेव्ह सध्यां त्याचा नामनिर्देश पुरे आहे.
 संयुक्तसामाजिक पंथाला मात्र हल्लींची समजरचनाच पसंत नाहीं. कारण हल्लीची समाजरचना खासगी मालमत्तच्या कल्पनेवर बसविलेली आहे या पंथाला ही संस्थाच मुळीं सर्व अनार्थाचें मूळ भासतें. तेव्हां मृले कुठारः ' या न्यायानें त्याचा हेतु ही संस्थाच नाहींशी करून सर्व संपत्ति संयुक्तमालकीची करण्याचा आहे.

या मालिकेकडे पाहिलें म्हणजे अराजक व विध्वंसक पंथ हे दोन्ही पंथ या पुढील पायरीप्रमाणेंच दिसतात यांत शंका नाहीं. कारण संयुक्तसामाजिक पंथाला खासगी मालमत्ता अनर्थाचें मूळ दिसतें तर अराजक पंथाला समाज व सरकार याच संस्था मनुष्याच्या अनार्थांचें अ आपत्तीचें मुळ दिसतात. कारण, समाज व त्यांतील सरकार यांनींच खासगी मालमत्तेच्या संस्थेचा उदय होतो व मालमत्तेची सुराक्षितता ठेवणें हें सरकारचें आद्याकर्तव्यकार्म समजले जातें यावरून समाजरचना व सरकार यांनीं सर्वत्र असमता उत्पन्न होते. तेव्हां या अगदीं मुख्य मूळावरच घाला घालणें रास्त आहे असें या पंथांना वाटतें.

    वरील विवेचनावरून संयुक्तसामाजिक पंथ व अराजक पंथ यांमध्यें बरेंच साम्य आहे असे म्हण्यात हरकत नाहीं . त्यांच्या उपायांत व साधनांत फरक असेल; परंतु सर्व जगांत दिसून येणाऱ्या संस्थाच अनार्थमूूलक आहेत आशी या पंथाच्या लोकांची समजूत असते . या पंथाला मनुष्य