या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[૨છ૨ ] स्वभावाची पारख नाहीं म्हणून अशा प्रकारची कल्पना त्यांच्या डोक्यांत येते असें म्हणणे प्राप्त आहे. संयुक्त सामाजिक पंथाला आरिस्टाटल या ग्रीक तत्ववेत्यानें आपल्या राजनीति या ग्रंथांत उत्तम त-हेचें उत्तर दिलें आहे. मनुष्यस्वभावच असा आहे कीं, त्याला आपलेपणा वाटल्याखेरीज त्याचे हातून हौसेनें व कळकळीनें श्रम होणार नाहींत. सर्वांचें काम तें कोणाचेंच काम नाहीं हें त्याचें म्हणणें म्हणीसारखेच झालेलें आहे. म्हणून आरिस्टाटलनें खासगी मिळकतीची कल्पना हीच मनुष्याची सुधारणा घडवून आणणारी संस्था होय असें म्हंटले आह. यावरून समाजाची जी हल्लीं बरी स्थिति आहे तीच खासगी मिळकतीमुळे आहे व खासगी मिळकतीचें संरक्षण करणा-या समाज व सरकार या संस्थांच्या योगानेंच सर्व मानवी सुधारणा झाली आहे असें म्हणणें ओघानें प्राप्त होतें. तेव्हां सामाजिक पंथांपैकीं हे पंथ आत्मघातकीपणाचे आहेत व ते समंजस लोकांना रुचण्यासारखे नाहींत हें उघड आहे. आतां या सामाजिक पंथाच्या इतिहासाकडे वळू. सामाजिक पंथ हा शब्द जरी अर्वाचीन असला तरी या पंथाच्या मुळाशीं असलेली कल्पना सर्व ठिकाणीं दिसून येत असल्यामुळे असे पंथा पुष्कळ ठिकाणीं व पूर्वकाळींही निघालेले आहेत. समाजामध्यें कांहीं अनर्थ दिसून आले; विशेषतः कांहीं लोक श्रीमंत व कांहीं अत्यंत हालअपेष्टांमध्यें असलेले दिसले म्हणजे या गोष्टीच्या कारणाकडे मनुष्याचें लक्ष जातें व ही स्थिति कशी सुधारतां येईल अशाबद्दल मनुष्य विचार करूं लागतो व पुष्कळ वेळां त्याला चालू असलेल्या स्थितींपेक्षां भिन्न प्रकारचे उपाय सुचतात. ग्रीक लोकांमध्यें प्लेटोनें जी एक समाजसुधारणेची कल्पना आपल्या प्रजासत्ताक नांवाच्या ग्रथांत दैिलेली आहे ती पुष्कळ अंशीं संयुक्तसामाजिक पंथाप्रमाणें आहे व या कल्पनेवर टीका करतांनाच आरिस्टाटलनें वर निर्दिष्ट केलेले विचार प्रदर्शित केले आहेत. तसेंच खासगी मालमत्ता अनर्थाचें मूळ आहे तेव्हां हीच काढून टाकण्याचे प्रत्यक्ष प्रयत्न झालेले आहेत. उदाहरणार्थ, ज्यू लोकांमध्यें अशा संयुक्त मालमतेच्या संस्था होत्या. क्रिश्चन धर्मामध्येही खासगी मिळकतीवर मोठा कटाक्ष होता. मानवी समाजाच्या बाल्यावस्थेत ग्रामसंस्थेसारख्या संस्था होत्या. व त्यामध्यें जमीन ही बहुधा संयुक्त म्हणजे