या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ૨૭ ]

     मजुरी-अर्वाचीन काळच्या औद्योगिक पद्धतींंत मजुराच्या श्रमाचें मोल त्यानें उत्पन्न केलेल्या मालावरून ठरत नाही; तर मजुराच्या श्रमाच्या उत्पत्तीच्या खर्चावरून ठरते; ह्मणजे मजूर व त्याचें कुटुंब यांच्या उपजीविकेस जितका खर्च अवश्यक असतो त्यावरून त्याच्या श्रमाचें मोल ठरतें. व या उपजीविकेला काय काय गोष्टी अवश्यक आहेत हें देशरिवाजाप्रमाणें व हवामानाप्रमाणें ठरलें जातें.
     मजुराच्या श्रमाचे दोन भाग करतां येतील. आपल्या उपजीविकेकरितां लागणाऱ्या वस्तु उत्पन्न करण्यास लागणारा श्रमाचा काळ हा अवश्यक काळापैकीं होय.श्रमाचा बाकीचा काळ हा श्रमाचा जादा काळ होय. हा जादा काळ किंवा हें जादा मोल कामाचे तास वाढवून किंवा मजुराची मजुरी कमी देऊन वाढवितां येईल. परंतु हें करणें कांहीं मर्यादेपलीकडे भांडवलवाल्यास फारसें शक्य नाहीं. तरी पण या दोन मर्यादांमध्यें बराच अवकाश आहे. आतां मजुरीच्या पद्धतीनें अशी स्थिति होते कीं, भांडवलवाले आपण मजुरीच्या सर्व वेळाचा मोबदला देतेों असें समजतात. परंतु वास्तविकपणें ते या काळाच्या एका भागाचाच मजुरांना मोबदला देतात. जहागिरीपद्धतीच्या काळीं मजूर आपल्या धन्याकरितां आठवड्यांतून एक दिवस देत असे. परंतु बाकीचा आठवडा तो अगरदीं मोकळा असे. आता मजुरीपद्धतीमध्यें कामदारांना निव्वळ जीव जगेल इतक्या मजुरीवर सर्व काळ भांडवलवाल्याकरितां राबावें लागतें. मजूर हे स्वतंत्र आहेत असें मानतात. परंतु वस्तुतः ते स्वतंत्र नाहीत. खरोखरीं पहातां मजुरांच्या श्रमाच्या एका भागाबद्ल त्यांस मोबदला देऊन त्यापासून त्यांच्या श्रमाचें सर्व फळ भांडवलवाले उपटतात.         
    या श्रमाचा सामान्य दिवस-कामाचा दंवस १८ पासून ८ तासांपयंत भिन्न भिन्न असतो. मार्क्सच्या मताप्रमाणें सरकारनें या बाबतींत हात घालून सररहा ८ तासांचा दिवस केला पाहिजे. नंतर त्यानें इंग्लंडांतील कारखान्याच्या कायद्याचा इतिहास देऊन हे कायदे चांगले आहेत. असें आपलें मत दिलें आहे. यंत्रे व तत्संबंधी शोध यांनी आधींच श्रीमंत असणा-या भांडवलवाल्यांना जास्तच श्रीमंत केलें आहे. या सुधारणा व शोध हे भांडवलानें घडविलेले नाहीत तर ते शास्त्रज्ञानाच्या योगानें झालेले आहेत.

१७