या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[२६७ ।। नेणा-या आहेत. कारण अशा ग्रामसंस्थांच्या स्थितींतून हल्लीची समाजस्थिति उक्रांत झाली आहे. व ज्याप्रमाणें पाण्याचा ओघ उलटत नाहीं त्याप्रमाणेच उक्रांतीचा ओघ उलटत नाही. तेव्हां या व्यक्तिक योजनाही म्हणण्यासारख्या विचारार्ह नाहीत.

 सामाजिक पथाच्या पोटभेदांपैकी राहता राहिला राष्ट्रीय सामाजिक पंथ. मागे सांगितलेंच आहे कीं, या पंथाच्या मताची थोडीबहुत छाप सर्व सुधारलेल्या सरकारांवर पडलेली आहे. कारण सामाजिक पंथाच्या सर्व  पोटाभेदांत ह्याच पोटभेद जास्त व्यवहार्य आहे. कारण सध्या प्रचलित  असलेल्या औद्योगिक पद्धतींत फारसा हात न घालतां तो  पंथ आपला हेतु कायद्यानें साध्य करण्याचा प्रयत्न करतो. बाकीच्या सर्व सामाजिक पंथाच्या योजना हल्लींची औद्योगिक पद्धति बदलण्याचा प्रयत्न करतात, पण त्याचा परिणाम संपत्तीचा झराच आटविण्यात होतो. यामुळे समाजांत संपत्तीरुपी पाण्याचें दुर्भिक्ष होण्याची भीति असते. मग हें दुर्भिक्ष सर्वांनी सारखें भासलें म्हणून या समतेंत फारसें समाधान मानण्यांत अर्थ नाहीं. राष्ट्रीय सामाजिक पंथ संपत्तीच्या झ-याला मुळींच हात लावीत नाहीं. तो पंथ पाण्याचा झरा जशाचा तसा कायम ठेवतो किंवा वाढविण्याचा प्रयत्न करतो. मात्र या झऱ्यातून जें गढूळ पाणी येतें व जें एका दिशेला फार पाणी जातें तें पाणी कायदारूपी फिल्टरानें स्वच्छ व निर्मळ करण्याचा प्रयत्न करतें व असें निर्मळ पाणी सर्व जमिनीला यथाप्रमाण मिळेल अशी तजवीज निरनिराळे पाण्याचे पाट तयार करून करते. या वर्णनांतील रूपक सोडून असे म्हणतां येईल कीं, राष्ट्रीय सामाजिक पंथ अर्वाचीन औद्योगिक पद्धतीमधली संपत्तीच्या वांटणीची विषमता कबूल करतो. परंतु ही विषमता काढून टाकण्याचा मार्ग म्हणजे ही औद्योगिक पद्धत नाहींशी करणें नव्हे; कारण अशानें संपत्तीची उत्पत्तिच बंद पडेल हें हा पंथ जाणती तेव्ह कायद्याच्या साहाय्यानें संपत्तीच्या वांटणीची विषमता कमी करावयाची हैं या पंथाच्या योजनांचें धोरण आहे. यामुळेच हा पंथ सर्वात व्यवहार्य ठरला आहे व त्याचा पगडा दिवसेंद्विस वाढत आह. या पंथाची  छाप वाढण्याचें दुसरेंही एक कारण आहे. तें हें कीं, अर्वाचीन काळी सरकारच्या कर्तव्यकर्माबद्दलची जुनी मर्यादित कल्पना जाऊन त्या ठिकाणी सरकारच्या कर्तव्यकर्माबद्दल उदार विस्तृत अशी कल्पना आलेली आहे.