या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याला पेन्शन मिळावयाचें. मात्र त्याच्याकरितां सुमारें २५ वर्षें तरी विम्याची रक्कम भरलेली असावी. कोणत्या मजुराला किती पेन्शन द्यावयाचीं हें ठराविण्याकरितां मजुरांचे त्यांच्या मजुरीप्रमाणें निरनिराळे पांच वर्ग केले आहेत. विम्याच्या रकमेपैकीं अर्धी रक्कम कारखानदाराने द्यावयाची व अर्धी मजुरानें द्यावयाची व प्रत्येक पेन्शनला सरकारनें ५० शिलिंग द्यावयाचे; अशीं या कायद्याची कलमें आहेत. पेन्शन व त्याबद्दल द्यावयाची रक्कम वगैरे माहिती खालील कोष्टकावरून होईल.


या वार्षिक पेन्शनामध्यें सरकारचे ५० शिलिंग मिळविले म्हणजे प्रत्येक कामदाराच्या पेन्शनाचा आंकडा ठरतो. आजारीपणाच्या विम्याच्या कायद्यान्वयें १९०६ साली जर्मनीमध्यें १३३१७३७४ पौंड खर्च झाले; अपघाताच्या कायद्यान्वये ७१५८०६३ पौंड व वार्धक्याबद्दलच्या पेन्शनाकरितां ८३०१९५७ पौंड खर्च झाले व याकायद्याचा फायदा मिळालेल्या कामदारांची १९०६ साली ११६८९३८८ इतकी संख्या होती. वरीलं हकीकतीवरून या कायद्याचा फायदा केवढ्या मोठ्या वर्गाला होत आहे याची सहज कल्पना येईल.